beed  sakal
मराठवाडा

Beed News : स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकाची दुरवस्था

मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यातील २३ हुतात्म्यांच्या स्मारक स्तंभाला तडे

सकाळ वृत्तसेवा

बीड - राज्य शासन एकीकडे हे वर्ष मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करीत आहे; दुसरीकडे मात्र ज्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्यात बलिदान दिले, त्याच स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाची दुरवस्था झाली आहे. स्मारक स्तंभाला मोठे तडे गेले असून, ते तत्काळ दुरुस्त करून नवीन पंचायत समिती परिसरात स्मारक उभारण्याची मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे.

देशाच्या स्वातंत्र्यानंतरही निजामशाहीच्या ताब्यात असलेला मराठवाडा संस्थान मिळवण्यासाठी मोठा लढा अनेकांनी उभा केला होता. या लढ्यात अनेकांनी बलिदान दिले तर, अनेक सैनिकांनी कारावास भोगला. या लढ्यातील जुन्या पंचायत समिती कार्यालय परिसरातील २३ हुतात्म्यांच्या स्मारकाची दुरवस्था झाली आहे.

एकीकडे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करताना जिल्हाभरात विविध उपक्रम राबविले जात आहेत. शालेय स्तरापासून ते महाविद्यालय स्तरापर्यंत मुलांना मुक्तीसंग्रामाचे महत्त्व सांगणारा एका तासाचा माहितीपट गावोगावी दाखविण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन आहे. यासह विविध व्याख्याने, स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. जिथे मुक्ती संग्रामातील महत्त्वाच्या घटना घडल्या, त्याठिकाणी स्मृती स्तंभ उभारण्यात येणार आहेत.

नवे स्मारक उभारा डॉ. ढवळे

जुन्या पंचायत समिती परिसरातील दुरवस्था झालेल्या स्वतंत्र सैनिकांच्या स्मारकाची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, नवीन पंचायत समिती परिसरात तातडीने नव्याने स्मारक उभारावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT