beed newsb  sakal
मराठवाडा

Beed News : श्रद्धेला मोल नाही; नारायणगडासाठी चार गावांतून ७२ लाख देणगी

श्री. क्षेत्र नगद नारायण गडाला धाकटी पंढरी म्हणून ओळखले जात आहे. आषाढी व कार्तिकी एकादशीसह वर्षभर या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम होतात.

सकाळ वृत्तसेवा

बीड - श्रद्धेला मोल नाही म्हणतात याचा प्रत्यय धाकटी पंढरी म्हणून महाराष्ट्रात ओळख असलेल्या श्री क्षेत्र नगद नारायण गडाच्या विकासासाठी मिळालेल्या देणगीतून येत आहे. आठवडाभरात चार गावांतून तब्बल ७२ लाख रुपयांची देणगी गडाचे मठाधिपती शिवाजी महाराज यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

दिवसेंदिवस भक्तांची गडावरील श्रध्दा वाढत असल्याचेच हे चित्र आहे. गडाकडून देखील विकासकामांबरोबरच सामाजिक कामांसाठी कायम पुढाकार घेतला जात आहे.

श्री. क्षेत्र नगद नारायण गडाला धाकटी पंढरी म्हणून ओळखले जात आहे. आषाढी व कार्तिकी एकादशीसह वर्षभर या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम होतात.

यासाठी जिल्ह्यासाठी राज्यभरातून लाखांवर भाविक येतात. याठिकाणी येणाऱ्या भाविकांना नगद प्रसाद मिळतो, अशी श्रध्दा येथील भक्तांची आहे. बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील काना-कोपऱ्यातून याठिकाणी भक्त येत असतात. मागील काही वर्षांत गडाच्या विकासात मोठी भर पडलेली असून गडाचे मठाधिपती शिवाजी महाराज हे गडाच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत.

गडाचे शिवाजी महाराज यांचे ज्या गावात कीर्तन आहे, त्याठिकाणच्या गावातून देणगी देण्याची स्पर्धाच भक्त मंडळीमध्ये सुरू होत आहे. या आठवड्यात गेवराई तालुक्यातील तांदळा येथील ग्रामस्थांनी गडावर बांधकामे करण्यासाठी ३१ लाख रुपयांची देणगी दिली आहे तर याच सैदापूर (ता. गेवराई) येथील भाविकांनी १५ लाख रुपयांची देणगी दिली आहे.

बीड तालुक्यातील ढोकरवाडी येथील बालगिरीबाबा यांच्या सप्ताहात २१ लाख ५७ हजार ५५५ रूपये देणगी देण्यात आली. विशेष म्हणजे याठिकाणी केवळ ५० घरे आहेत

तर धुमाळवाडी (ता.बीड) येथील ग्रामस्थांनी ५ लाख रूपयांची देणगी दिली आहे. दरम्यान, श्री.क्षेत्र नगद नारायण गडाच्या वतीने काकडहिरा (ता.बीड) येथे गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी १०० बेडचे वसतीगृह बांधण्यात आलेले आहे. याठिकाणी गरिबांची लेकरं शिकावीत, यासाठी मोठा खर्च करण्यात आलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT