माजलगाव (जि.बीड) : तालुक्यातील खतगव्हाण येथे चुलबंद आंदोलन शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गुरूवारी (ता.एक) करण्यात आले.  
मराठवाडा

Beed Updates : कृषी दिनी शेतकऱ्यांनी पुकारले चुलबंद आंदोलन

कमलेश जाब्रस

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी साठ कोटी तर केंद्र शासनाने व राज्य शासनाचे ८०० कोटी असा ८६० कोटी रूपयांचा पिकविमा भरलेला असुन त्याचा परतावा मात्र फक्त तेरा कोटी रूपयेच मिळाला आहे.

माजलगाव (जि.बीड) : मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यातील Beed शेतकऱ्यांना पिकविम्यापासुन Crop Loan वंचित रहावे लागत आहे. शेतकऱ्यांना पिकविमा मिळावा. यासाठी शासनाने अॅग्रिकल्चर इन्श्युरन्स कंपनी आॅफ इंडिया Agriculture Insurance Company Of India या विमा कंपनीची नियुक्ती केली आहे. मात्र दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना Farmer पिकविमा मिळालेला नाही. या मागणीसाठी तालुक्यातील खतगव्हाण येथे चुलबंद आंदोलन शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गुरूवारी (ता.एक) करण्यात आले. तालुक्यातील खतगव्हाण येथे पिकविमा मिळावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी चुलबंदची हाक दिली होती. कृषीदिन व संत जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखी प्रस्थानाचा दिवस आहे. तुकाराम महाराजांची पालखी आज प्रस्थान करत असते. त्याचाच एक भाग म्हणुन पात्रुड व कान्सुर येथील दोन दिंड्या एकत्र येत खतगव्हाणमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०२०-२१ चा विमा मिळावा या मागणीसाठी चुलबंद आंदोलन करत गावातुन दिंडी काढत अनोखे आंदोलन केले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी साठ कोटी तर केंद्र शासनाने व राज्य शासनाचे ८०० कोटी असा ८६० कोटी रूपयांचा पिकविमा भरलेला असुन त्याचा परतावा मात्र फक्त तेरा कोटी रूपयेच मिळाला आहे. शेतकऱ्यांनी या प्रकरणी वेगवेगळे आंदोलन केले Majalgaon असले तरी शासनाने मात्र कसल्याही प्रकारची दखल न घेतल्याने खतगव्हाण येथे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली चुलबंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मुरली बुरंगे, शहाजी बुरंगे, गजानन बुरंगे, प्रताप बुरंगे, अर्जुन पायघन, सदाशिव पायघन, दत्ता तसनुसे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले आहेत.beed news farmer's agitation on krishi day in majalgaon tahsil

चुलबंद आंदोलन शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गुरूवारी (ता.एक) करण्यात आले.

शेतकरी वंचित

जगाचा पोशिंदा म्हणुन शेतकरी ओळखला जातो. आर्थिक अडचणीतून देखील या शेतकऱ्यांनी पिकविमा भरलेला आहे. मात्र शासनाच्या उदासीन आणि विमा कंपनीच्या Crop Loan आडमुठ्या धोरणामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वंचित रहावे लागत आहे. कृषी दिनी शेतकऱ्यांना अन्नत्याग, चुलबंद आंदोलन करावे लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railway : नवरात्रोत्सवापासून ते दिवाळीपर्यंत... 'या' राज्यात धावणार विशेष गाड्या; 6,000 गाड्यांचं नियोजन, पाहा रेल्वेचं वेळापत्रक

Women Health: पाळी, गरोदरपणा आणि रजोनिवृत्तीचा स्त्रियांच्या आतड्यांवर परिणाम; वाचा डॉ. राकेश पटेल यांचे सविस्तर मार्गदर्शन

Gemini AI Photo Trend: जगातील नेत्यांसोबत हायपर-रिअ‍ॅलिस्टिक फोटो तयार करा! जाणून घ्या सोप्या स्टेप्स...

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजना बंद होणार नाही: मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही

SIP Top 5 Mistakes: SIP मध्ये गुंतवणूक करताय? या 5 चुका टाळा, नाहीतर रिटर्न्स मिळण्याऐवजी नुकसान होऊ शकतं

SCROLL FOR NEXT