Accident News  sakal
मराठवाडा

Beed Accident : दुचाकी चालवताना रील बनवणे बेतले जिवावर; बीडमध्ये महामार्गावर दुचाकी दुभाजकाला धडकून युवकाचा मृत्यू

दुचाकीवर पाठीमागे बसलेला तरुण रील बनवताना दुचाकी चालकाने त्याच्याकडे पाहत स्माइल देण्याचा प्रयत्न केला.

सकाळ वृत्तसेवा

बीड: दुचाकीवर पाठीमागे बसलेला तरुण रील बनवताना दुचाकी चालकाने त्याच्याकडे पाहत स्माइल देण्याचा प्रयत्न केला. या गडबडीत चालकाचे लक्ष विचलित झाल्याने दुचाकी दुभाजकावर धडकली व या अपघातात रील बनवणारा तरुण जागीच ठार झाला. तर, दुचाकी चालकही गंभीर जखमी झाला. अनिरुद्ध कळकुंबे (वय २५) असे या घटनेत ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर मधू शेळके (वय ३०) असे जखमी तरुणाचे नाव आहे. दोघेही जालना शहरातील गणेशपूर भागातील रहिवासी आहेत.

मधू शेळके व अनिरुद्ध कळकुंबे शुक्रवारी (ता.पाच) सकाळी दुचाकीवरून (एमएच २१, एम ११५४) बीडमार्गे तुळजापूरला जात होते. मधू दुचाकी चालवत होता तर, अनिरुद्ध त्याच्यामागे बसलेला होता. बीडजवळील बाह्यवळण रस्त्यावर दुचाकीवर आली असतानाच अनिरुद्ध हा आपल्या मोबाइलवर रीलसाठी व्हिडिओ तयार करू लागला.

यावेळी दुचाकीचालक असलेल्या मधू शेळकेचे लक्ष विचलित झाले. त्यामुळे दुचाकी बाजूच्या कठड्यावर जाऊन धडकली. या अपघातात अनिरुद्धच्या डोक्याला व छातीला गंभीर मार लागून तो जागीच ठार झाला. तर दूरपर्यंत फरपटत गेल्याने मधू शेळकेच्या दोन्ही पायांना गंभीर मार लागला असून दोन्ही पाय मोडले आहेत. शनिवारी (ता. सहा) सोशल मीडियावर ही रील व्हायरल झाल्याने ही घटना समोर आली. या दोघांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. जखमीला छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले होते. याप्रकरणाची शनिवारी दुपारपर्यंत बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली नव्हती.

ते हास्य क्षणात विरले
धुळे-सोलापूर महामार्ग अतिशय वर्दळीचा असा आहे. या मार्गावर सातत्याने अवजड वाहतूक होत असते. या धोक्याकडे दुर्लक्ष करून अनिरुद्धने रील बनवण्यासाठी मोबाइल काढला. या रीलमध्ये सहभागी होण्यासाठी मधूने मागे वळून स्मितहास्य केले. मात्र याच दरम्यान वाहन अनियंत्रित होऊन दुभाजकाला धडकले व दुर्घटना घडली. रीलसाठी केलेले हास्य क्षणातच विरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''...कारण आम्ही भटके आहोत'', बंजारा-वंजारा वादावरुन धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण

Latest Marathi News Updates : ओबीसींचा बॅकलॉग तातडीने भरावा; सरकारचा जीआर वादग्रस्त – छगन भुजबळ

IND A vs AUS A: १९ वर्षाच्या पोराने भारतीय गोलंदाजांना झोडले, लखनौमध्ये शतक; श्रेयसचं नशीब महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने त्याला OUT केले

Agricultural News : कमी खर्चात लाखोंचे उत्पन्न: इगतपुरीचे शेतकरी बांबू लागवडीकडे वळले

"यांचे अजून बारा वाजले नाहीत का ?" उपमुख्यमंत्र्यांच्या बैठीकीनंतरही रस्त्याची परिस्थिती जैसे थे ! चेतना भट्टच्या नवऱ्याचा संताप

SCROLL FOR NEXT