beed sakal
मराठवाडा

Beed News : बीडमधील खड्डे बुजवा,अनधिकृत बॅनर हटवा

शांतता समितीची बैठक; नागरिकांचा तक्रारींचा पाऊस

सकाळ वृत्तसेवा

बीड - शहरातील रस्त्यांवरून चालणे कठीण झाले आहे. सर्वत्र खड्डे पडले असून आता चिखलही होत आहे. ठिकठिकाणी अनधिकृत बॅनरमुळे अपघातांचा धोका असून पालिकेच्या दुर्लक्षामुळे राष्ट्रपुरुषांच्या पुतळा परिसराचे व शहराचे विद्रूपीकरण होत आहे.

त्यामुळे अनधिकृत बॅनर हटवावेत, रस्त्यांची दुरुस्ती करावी अशा मागण्यावजा तक्रारी शहरातील नागरिकांनी केल्या.

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी (ता. १३) जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख आदींसह अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

गणेश मंडळाच्या पदाधिकारी व नागरिकांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासह राष्ट्रीय महामार्गावरील अनधिकृत बॅनरचा मुद्दा उपस्थित केला. तसेच, शहरात बहुतांशी रस्ते खड्डेमय झाल्याच्या तक्रारी केल्या. गेल्या सहा महिन्यांपासून बीड शहरामध्ये सर्वच कार्यक्रमांचे बॅनरयुद्ध सुरू आहे.

त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. शहरातील धुळे - सोलापूर मार्ग सोडला तर नगर रोड आणि धोंडीपुरा व इतर मार्गांत सर्वत्र खड्डेच खड्डे आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेऊन हे बॅनर तत्काळ हटवावेत, गणेशोत्सवासह इतर सणांच्या पूर्वी सर्व खड्डे बुजवावेत, अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान, संबंधित विभागांना सूचना देण्यात येतील, असे दीपा मुधोळ-मुंडे म्हणाल्या. आगामी सण सर्वांनी शांततेत साजरे करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. नंदकुमार ठाकूर यांनी गणेशोत्सवाच्या काळात अत्यावश्‍यक बंदोबस्त लावल्याचे नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Revenue Court: महसूल न्यायालयाचे कामकाज मराठीतून, नवी 'एसओपी' लागू; प्रकरणांचा झटपट निपटारा होणार!

Nashik Drowning: ३ मुलं डोळ्यासमोर गटांगळ्या खायला लागली, आईने वाचवायला उडी मारली; बुडून चौघांचाही मृत्यू..

Mobile Recharge Hike : लवकरच मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर दुसरा मोठा धक्का

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

मी सागरची गर्लफ्रेंड, हळदीच्या कार्यक्रमात राडा; ८ लाखांचा खर्च, लग्न मोडताच वधुची पोलिसात धाव, नवरदेवाला अटक

SCROLL FOR NEXT