beed  sakaol
मराठवाडा

Beed News : भूमिहीन पाल्याची ‘नासा’ भरारी आज होणार अमेरिकेकडे रवाना

हुशारीने थेट अमेरिकेला कूच , झेडपीचे ११ विद्यार्थी व अधिकारी आज होणार रवाना

दत्ता देशमुख - सकाळ वृत्तसेवा

बीड - गुंठाभर जमीन नाही, त्यामुळे आई - वडिलांना रोज एकाच्या बांधाला जावे लागते. मात्र, विशालने आई - वडिलांचे पांग फेडत त्यांच्या कष्टाचे चीज केले आणि आपल्या हुशारीच्या जोरावर थेट अमेरिकेतील नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (नासा) संशोधन केंद्राकडे आज विमानाने कूच करणार आहे.

vishal

ही यशकथा आहे लऊळ (नंबर एक) येथील विशाल दिगांबर गायके याची. विशेष म्हणजे परिस्थितीमुळे विशालला कधी जिल्ह्याचे ठिकाण बीडला यायचाही योग आला नाही. जिल्हा परिषदेचे ११ विद्यार्थी आणि तीन अधिकाऱ्यांसह एक महिला वैद्यकीय अधिकारी असा चमू गुरुवारी (ता. सात) ते ता. १८ या कालावधीत अमेरिकेची सफर करणार आहे.

जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा यासाठी विद्यार्थ्यांना श्रीहरी कोटा व अमेरिकेतील नासा या अंतराळ संशोधन केंद्रांची सहल घडविण्याची संकल्पना शासनाने समोर आणली. स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर २२ हजार विद्यार्थ्यांमधून केंद्र, तालुका, नंतर जिल्ह्याच्या ठिकाणी परीक्षा घेऊन ११ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

यात निवड झालेला विशाल गायके भूमिहिन मजूर कुटुंबातील आहे. लऊळ (ता. माजलगाव) येथील विशालचे वडील दिगांबर व आई महानंदा यांना दोन मुलांचे शिक्षण, पालनपोषण करण्यासाठी मजुरीसाठी रोज एकाच्या बांधावर जातात. नववीत शिक्षण घेणारा विशाल हुशार असल्याने या संशोधन सहलीसाठी निवड परीक्षेत माजलगाव तालुक्यातून पहिला क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे परीक्षेच्या निमित्ताने त्याने प्रथम जिल्ह्याचे ठिकाण बीड पाहिले.

आता मात्र तो आपल्या हुशारीच्या बळावर अमेरिकेची सफर आणि नासा हे प्रसिद्ध संशोधन केंद्र पाहणार आहे. दरम्यान, यात निवड झालेला युवराज सानप देखील शेतकरी कुटुंबातील असून त्याने या परीक्षेत शिरूर कासार तालुक्यातून पहिला क्रमांक पटकावला आहे. रिझर्व्ह बँकेने देशपातळीवर घेतलेल्या सामान्यज्ञान प्रश्नमंजूषा परीक्षेत पश्चिम विभागात तिसरा क्रमांक पटकावला. यातील ३३ विद्यार्थ्यांना सुरुवातीला इस्त्रो या भारतीय अंतराळ संशोधन केंद्राची सफर दोन महिन्यांपूर्वीच पूर्ण केली.

आता विद्यार्थी अमेरिकेतील ओरलॅण्डो येथील जे. एफ. केनडी अंतराळ केंद्रात तीन दिवस तज्ज्ञांकडून संशोधन विषयक माहिती घेतील. त्यानंतर वॉशिंग्टन डी. सी. येथील जगप्रसिद्ध स्मिथसोनीयन म्युझिअमलाही भेट देतील.

मुलींत एकमेव भाविका फड

इस्त्रो व नासा सहलीसाठी जिल्हाभरातील जिल्हा परिषद शाळांतील पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. परळी तालुक्यातील दौंडवाडीच्या पाचवीत शिकणाऱ्या भाविका फडने आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना टफ देत तालुक्यातून पहिला क्रमांक पटकावला. ११ विद्यार्थ्यांमध्ये ती एकमेव मुलगी आहे.

स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांची १० दिवसांची ही सहल असेल. आज चांगल्या टुर्स कंपनीच्या माध्यमातून ही सहल होणार असून विद्यार्थ्यांच्या काळजीसाठी अधिकाऱ्यांचे पथकही सोबत आहे.

- वासुदेव सोळंके,

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड

आज चमू होणार अमेरिकेकडे रवाना

वैभव पिसाळ (कुंबेफळ, ता. अंबाजोगाई), जयवर्धन झांडे (कडा, ता. आष्टी), शिवप्रसाद कोकाटे (चौसाळा, ता. बीड), अंशुमन दुबे (धारुर), प्रतिक गव्हाणे (दिमाखवाडी, ता. गेवराई) अजय शेळके (येवता, ता. केज), विशाल गायके (लवूळ, ता. माजलगाव), भाविका फड (दौंडवाडी, ता परळी), पृथ्वीराज पवार (जरेवाडी, ता. पाटोदा), युवराज सानप (खोकरमोहा, ता शिरूर कासार), पार्थ मुंडे (सोन्नाखोटा, ता. वडवणी) या विद्यार्थ्यांसह सहल प्रमुख अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, शिक्षणाधिकारी (प्रा.) श्रीकांत कुलकर्णी, ज्येष्ठ अधिव्याख्याता प्रा. डॉ. विक्रम सारुक तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. वासंती चव्हाण यांचा चमूत समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News : भीषण अपघात ! म्हशीला वाचवताना ४ वाहनांची धडक; ४ ठार, अनेक जखमी

Panchang 12 October 2025: आजच्या दिवशी आदित्य हृदय स्तोत्र पठण व ‘श्री सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करावा

३७ वर्षांच्या संसारात कधीही अशोक सराफ 'ही' गोष्ट निवेदितांसमोर बोलले नाहीत; म्हणाल्या, 'नंतर त्याला विचारल्यावर...'

Latest Marathi News Live Update : शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात काम केल्याची पालकमंत्री जयकुमार गोरे यांची कबुली; शहाजी पाटीलांचा पलटवार

CM Yogi Adityanath : सीएम योगींच्या 'स्वदेशी अभियाना'ला नवी भरारी; 'स्वदेशी मेळ्यां'मुळे कारागिरांची दिवाळी होणार समृद्ध!

SCROLL FOR NEXT