मराठवाडा

नागरी सुविधांसाठी रिपाइंची निदर्शने

सकाळवृत्तसेवा

बीड - नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी असताना या सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष करीत असलेल्या बीड पालिकेच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने गुरुवारी (ता.१०) पालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीने पालिका परिसर दणाणून गेला. निवेदन स्वीकारण्यासाठी मुख्याधिकारी धनंजय जावळीकर उपस्थित नसल्याने त्यांच्या केबिनमध्ये जाऊन रिकाम्या खुर्चीला चपलांचा हार घालण्यात आला.

बीडमध्ये पात्र लाभार्थींच्या घरकुलाचा प्रश्न प्रलंबित आहे. याशिवाय शहरात चांगले रस्ते नसून सर्वच रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. शहरातील सर्वच भागातील नाल्या तुंबलेल्या असून, थोडाही पाऊस झाला तरी नाल्यांतील पाणी रस्त्यांवर येते. यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. याशिवाय रात्रीच्या वेळी बहुतांश भागात रस्त्यांवरील वीज गूल असते. शहरवासीयांना वेळेवर शुद्ध पाणी मिळत नाही आदी नागरी सुविधांचे प्रश्न सोडविण्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. 

पालिकेच्या वतीने वाटप करण्यात आलेल्या घरकुलांची थकित रक्कम तत्काळ देण्यात यावी, नवीन घरकुलांना तत्काळ मंजुरी देण्यात यावी, बीड शहर खड्डेमुक्त करण्यासाठी शहरात नवीन रस्त्यांची कामे सुरू करण्यात यावीत, शहरातील घाणीचे साम्राज्य दूर करण्यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी जावळीकर यांना बडतर्फ करण्यात यावे, पालिकेचे भ्रष्टाचारी रोजंदारी अभियंता अकिल फारोखी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, सफाई कामगारांना समान काम-समान वेतन देऊन सेवेत कायम नियुक्ती द्यावी आदी मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाप्रमुख पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी पालिकेसमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

निदर्शकांमध्ये राजू जोगदंड, किसन तांगडे, सुभाष गायकवाड, मझहर खान, दिलीप खंदारे, श्री. जुबेर, सिद्दीक फारोखी, अविनाश जोगदंड, संगीता वाघमारे, प्रभाकर चांदणे, श्रीकांत साबळे, बंटी कागदे, अमर विद्यागर, दीपक अरुण, मिलिंद पोटभरे, गोट्या वीर, नितीन जोगदंड, नुरूल खान, भालचंद्र मराठे, सुरेश वडमारे, अंकुश गंगावने, बाबासाहेब शिंदे, विनोद शिंदे, अमोल शिंदे, कल्याण शिंदे, शरद शिंदे, बंडू गायकवाड, भाऊसाहेब कांबळे, राहुल सिरसट, भैय्या वाघमारे, रेवननाथ कसबे, चिंतामन वाघमारे, भाऊसाहेब दळवी, कृष्णा साबळे, आकाश साबळे, नितेश साबळे आदी सहभागी झाले होते.

रोजंदारी सफाई कामगारांचाही सहभाग
समान काम-समान वेतनाच्या मागणीसाठी तसेच शासकीय सेवेत कायम करण्यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी रोजंदारी सेनेच्या नेतृत्वाखाली सफाई कामगारांची पालिकेसमोर गुरुवारी निदर्शने सुरू होती. याच वेळी रिपाइंच्या वतीनेही निदर्शने सुरू करण्यात आल्यावर सफाई कामगारांनी रिपाइंच्या निदर्शनांमध्ये सहभागी होत पालिकेच्या बेजबाबदार कारभाराविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT