beed sakal
मराठवाडा

Beed News : ‘नासा’चा अभ्यास करून विद्यार्थी परतले

अमेरिकेतील नासा या अंतराळ संशोधन केंद्रांची सहल घडविण्याची संकल्पना शासनाने हाती घेतली आहे. याअंतर्गत ही सहल पार पडली.

सकाळ वृत्तसेवा

बीड - अमेरिकेतील नासा अंतराळ संशोधन केंद्रासह विविध स्थळांच्या अभ्यास दौऱ्यासाठी गेलेले जिल्हा परिषदेचे ११ विद्यार्थी आणि तीन अधिकाऱ्यांचे पथक मंगळवारी (ता. १८) सायंकाळी बीडमध्ये परतले. माजी आमदार संजय दौंड यांनी या चमुचा सत्कार केला.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

ता. सात रोजी सहल प्रमुख तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, शिक्षणाधिकारी (प्रा.) श्रीकांत कुलकर्णी, अधिव्याख्याता विक्रम सारुक, वैद्यकीय अधिकारी डॉ. वासंती चव्हाण यांच्यासह वैभव पिसाळ, जयवर्धन झांडे, शिवप्रसाद कोकाटे, अंशुमन दुबे, प्रतिक गव्हाणे, अजय शेळके, विशाल गायके, भाविका फड, पृथ्वीराज पवार, युवराज सानप, पार्थ मुंडे हे ११ विद्यार्थी बीडहून मुंबईमार्गे अमेरिकेला रवाना झाले होते.

जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढावा यासाठी विद्यार्थ्यांना श्रीहरी कोटा येथील श्रीहरी व अमेरिकेतील नासा या अंतराळ संशोधन केंद्रांची सहल घडविण्याची संकल्पना शासनाने हाती घेतली आहे. याअंतर्गत ही सहल पार पडली.

ता. १८ पर्यंतच्या दौऱ्यात विद्यार्थी व अधिकाऱ्यांनी अमेरिकेतील ओरलॅण्डो येथील जे. एफ. केनडी अंतराळ केंद्र, वॉशिंग्टन डी. सी. येथील स्मिथसोनीयन म्युझिअम, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, व्हाईट हाऊस, अब्राहम लिंकन मेमोरिअल, नायगरा धबधबा, टाईम्स स्क्वेअर, वर्ल्ड ट्रेड सेंटर स्मारक, न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजची पाहणी व अभ्यास केला. मंगळवारी सकाळी हा चमू मुंबईत पोचला. यशस्वी सहलीबद्दल सायंकाळी बीडमध्ये या चमुचे स्वागत करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT