beed maramari. 
मराठवाडा

बीडमध्ये भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; पोलिस घटनास्थळी

प्रविण फुटके

परळी वैजनाथ (बीड): जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे शनिवारी (ता.२०) मतदान घेण्यात आले. मतदान प्रक्रिये दरम्यान मतदानाची वेळ संपत आल्याने मतदान करण्यावरून भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादीहून धकाबुक्की झाली. पोलिसांनी वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टळला.

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीच्या मतदानावेळी शनिवारी (ता.२०) मतदान केंद्रावर चार वाजता एक मतदार मतदान करण्यासाठी गेला असता त्यास भाजपच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत या मतदारास मतदान करु देवू नका. मतदान केंद्र प्रमुखांना हे मतदान करून घेवू नका असे म्हणत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिनिधींना यास आक्षेप घेतला व मतदान करुन घ्या. दरम्यान केंद्र प्रमुखांनी सांगितले की, तो मतदार वेळ संपण्याअगोदर आल्याने मतदान करून घ्यावे लागेल.

यावरून भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते आमनेसामने आले. या वादावादीचे रूपांतर धकाबुक्कीत झाले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र यावेळी परिसरात एकच गदारोळ माजला होता. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी घटनास्थळी येवून भाजपच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले की, हे शेवटी झालेल्या मतदानावर आमचा आक्षेप आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सतत बोगस मतदान करण्यात आघाडीवर असतात. त्यांचे हे नेहमीचे आहे. आम्ही यावरून दाद मागणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT