धानोरा (जि.बीड) : अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा खुर्द परिसरात गुरुवारी (ता.२३) रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसाने मांजरा नदी काठ, ओढे-नाले परिसरातील शेती जलमय झाली आहे. 
मराठवाडा

Beed Rain : बीडमधील धानोरात शेती जलमय, पावसामुळे मोठे नुकसान

अशोक कोळी

धानोरा (जि.बीड) : अंबाजोगाई (Ambajogai) तालुक्यातील धानोरा खुर्द परिसरात गुरुवारी (ता.२३) रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसाने मांजरा नदी (Manjara River) काठ, ओढे-नाले परिसरातील शेती जलमय (Agriculture) झाली आहे. शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे. सर्व पिके पाण्यात आहेत. शुक्रवारी (ता.२४) सकाळी धानोरा-तटबोरगाव, धानोरा - आपेगाव ओढ्याचे पाणी पुलावरून वाहत असल्याने काही तास वाहतूक (Beed) बंद होती. धानोरा खुर्द परिसरातील आपेगाव, कोपरा, अंजनपूर, तटबोरगाव, देवळा सोमनाथ, बोरगाव, हिवरा, माकेगाव आदी गावांत गुरुवारी अतिवृष्टी झाली. या (Rain In Beed) पावसात हातातोंडाशी आलेले सोयाबीन आणि इतर पिके पाण्यात गेले आहेत.

मांजरा धरणाचे पाणी नदी पात्रात सोडल्याने ओढे, नदी-नाले याचे पाणी मांजरा घेत नसल्याने ओढे, नदी-नाल्यांचा परिसर जलमय झाला आहे. पिकात कंबरे इतके पाणी साचले आहे. शेतकऱ्यांचे या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. धानोरा खुर्द परिसरातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. अंजनपूर, कानडी, बोरगाव बॅरेजचे दोन गेट खराब झाल्याचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

Pune Hospital Row: टीकेच्या झंझावातात भिमाले माघारी; बाणेर कर्करोग रुग्णालयावरील वडिलांचे नावाचा फलक हटवला

Devgad Hapus AI : देवगड हापूस गुणवत्तेसाठी AI स्कॅनिंग मशीनला अनुदान द्यावे; राहुल शेवाळे यांची केंद्रीय कृषिमंत्र्याकडे मागणी

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

SCROLL FOR NEXT