beed beed
मराठवाडा

बीडमध्ये शिवसेना राणेंविरोधात आक्रमक; गाढवावरून काढली प्रतिकात्मक पुतळ्याची यात्रा

एका गटाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तर दुसऱ्या गटाने जिल्हा प्रमुखांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले

सकाळ वृत्तसेवा

एका गटाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तर दुसऱ्या गटाने जिल्हा प्रमुखांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले

बीड: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत शिवसेनेने मंगळवारी (ता. २४) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात आंदोलन केले. परंतु, शहरात आंदोलनादरम्यान शिवसेनेतील फुटीचे दर्शन घडले. एका गटाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तर दुसऱ्या गटाने जिल्हा प्रमुखांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. या विरोधात शिवसेना आक्रमक झाली. गणेश वरेकर, सागर बहिर आदींनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गाढवावरून प्रतिकात्मक पुतळ्याला चपलेचा हार घालून नगर रोडवरून मिरवणूक काढली. तसेच घोषणाबाजी करत प्रतिमेचे दहन केले. प्रतिमेला चपलांनी मारहाणही करण्यात आली. तर, दुसरे आंदोलन नगर नाका परिसरात झाले.

कोंबड्या उडवून आणि नारायण राणेंना अरबी समुद्रात बुडवा किंवा शिवसैनिकांच्या हवाली करा, अशा घोषणा देत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी याबाबत पोलिसांत लेखी तक्रारही दिली आहे. नारायण राणे यांना आग्रा येथील मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करा. नारायण राणेंना अरबी समुद्रात बुडवा किंवा शिवसैनिकांच्या हवाली करा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. परमेश्वर सातपुते, आशिष मस्के, गोरख सिंघन, सुनील सुरवसे, मशरु पठाण, रतन गुजर, कल्याण कवचट, सखाराम देवकर, देवराव घोडके, शिवाजी कोलगंडे, शंकर चव्हाण, राजाभाऊ नवले, रंजीत कदम, संजय उगले, सुमंत रुईकर, नंदु येवले, समीर बेग,अर्जुन नलावडे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झारखंड विद्यार्थी आंदोलनापुढे सरकार झुकलं! JSSC CGL परीक्षा रद्द; मुख्यमंत्री सोरेन यांची मोठी घोषणा

Karad News : कऱ्हाडचे अमोल होमकर सीआरपीएफचे महानिरीक्षक; संवेदनशील मणिपूर, नागालँडची जबाबदारी

Koregaon News : वडिलांची चित्रकला जपतोय मुलगा! बारावीतील अवधूत साकारतोय अनेक मान्यवरांची हुबेहूब पोर्ट्रेट

Donald Trump: इराणशी गुप्त चर्चेमागे कोण? ट्रम्प प्रशासनाने IRGC पर्यंत कशी पोहोच मिळवली? सीक्रेट कनेक्शन आलं समोर

MPSC Exam : जिद्द अन् परिश्रमातून यश; कंद यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड

SCROLL FOR NEXT