Beed Crime Sakal
मराठवाडा

धक्कादायक! ठाकरे गट जिल्हाप्रमुखाच्या कलाकेंद्रात चालत होता वेश्या व्यवसाय; 2 महिन्यातच हकालपट्टी | Beed Crime

यामध्ये ५ अल्पवयीन मुलींसह १५ महिलांचा वापर करून घेण्यात येत होता.

दत्ता लवांडे

बीड : बीड जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांच्या भागीदारीत असलेल्या कलाकेंद्रात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बीडच्या उमरी गावालगत हा प्रकार उघडकीस आला असून यामध्ये १२ वर्षे ९ महिन्याच्या मुलींचाही वापर करून घेण्यात आल्याची माहिती आहे.

अधिक माहितीनुसार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बीड जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांची भागीदारी असलेल्या कलाकेंद्रामध्ये हा प्रकार घडला आहे. केज तालुक्यातील उमरी गावालगत महालक्ष्मी कलाकेंद्र नावाने कलाकेंद्र आहे, या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. यामध्ये ५ अल्पवयीन मुलींसह २६ महिला आणि २८ पुरूषांना ताब्यात घेण्यात आलं असून जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांच्यासह ३६ जणांवर बीडच्या केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नाकर शिंदे यांची नुकतीच झाली होती जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

रत्नाकर शिंदे यांची दोन महिन्यापूर्वी बीडच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीत त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नियुक्तीवरून दोन गटात हाणामारी झाली होती, यावेळी सुषमा अंधारे यांच्या कानाखालीसुद्धा मारण्यात आली होती. पण वेश्याव्यवसायाच्या प्रकरणानंतर आता त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

"रत्नाकर शिंदे यांच्या कुंटणखान्यातून एका दलित मुलीसह अनेक महिलांची सुटका करण्यात आली आहे. महिलांच्या सन्मानाशी खेळणाऱ्या आणमि पक्षातील पदे विकणाऱ्या नेत्याला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे संरक्षण का देत आहेत? सुषमा अंधारे यांनी याप्रकरणी उत्तर द्यावं" अशी टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT