Beed school student letter to Chief Minister 
मराठवाडा

Beed : आई-वडिलांप्रमाणे आम्ही ऊस तोडावा का?

कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थ्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र

सकाळ वृत्तसेवा

किल्लेधारूर : तालुक्यातील बहुतांश भाग हा ऊसतोड मजुरांचा आहे. या ठिकाणी अगोदरच शैक्षणिक सुविधेचा अभाव आहे. आता त्यात वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे जायभायवाडी येथील चौथीतील एका विद्यार्थ्याने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ‘आई-वडिलांप्रमाणे आम्हीही ऊस तोडावा का?’ असा प्रश्न केला.

शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या २० पेक्षा कमी विद्यार्थी पट असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, जायभायवाडी येथील शाळाही कमी पटसंख्येची आहे. त्यामुळे तीही बंद होणार आहे. हे कळताच या शाळेतील समाधान बाबासाहेब जायभाये या विद्यार्थ्याने थेट मुख्यमंत्री यांना पक्ष लिहून आपल्या भावना मांडल्या.

शाळा बंद करू नका. तसे झाले तर आमचे शिक्षण थांबेल आणि आम्हाला आई-वडिलांप्रमाणे ऊसतोडीसाठी जावे लागेल असा आशय या पत्रात आहे. दरम्यान, कान्होबा तांडा येथील जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद करण्यात आलेली आहे.

  • तालुक्यात २० पेक्षा कमी पटसंख्या असलेला शाळा ः २९

  • ११ ते २० पटसंख्या असणाऱ्या शाळा ः २४

  • ६ ते १० पटसंख्या असणाऱ्या शाळा ः ३

  • ० ते ५ पेक्षा पटसंख्या असणाऱ्या शाळा ः २

असे आहे पत्र

‘साहेब, आमचे सर म्हणाले की, आमची शाळा बंद होणार आहे. जर माझी शाळा बंद झाली तर माझं काय होईल? माझे आई-वडील ऊसतोड कामगार आहेत. जर माझी शाळा बंद झाली तर मलासुद्धा ऊस तोडायला जावे लागेल आणि मीसुद्धा मोठा ऊसतोड कामगार म्हणून ओळखला जाईल. म्हणून तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे की, माझी शाळा बंद करू नका. जर आमची शाळा बंद झाली तर आम्हाला दुसऱ्या गावाला शिकायला जावे लागेल. वाटेत ओढे आहेत आणि त्या पाण्यातून जावे लागेल. आम्ही पहिली, दुसरीची मुले आहोत. मग आम्ही कसे जायचे?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मराठी विजय मेळाव्यासाठी नवी मुंबईतून शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींनो बँक बॅलेन्स चेक करा... किती येणार 1500 की 3000? जून महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

"अरे एडिटिंग तरी धड करा" सारंगच्या कावड वारीचा प्रोमो बघून प्रेक्षकांनी दाखवली चूक ; म्हणाले..

PM Modi Leaf Plate: मोदींनी परदेश दौऱ्यात 'या' खास पानावर केले जेवण, जाणून घ्या 'या' पानावर जेवणाचे काय आहेत फायदे

SCROLL FOR NEXT