Beed News esakal
मराठवाडा

Beed|'जय महेश'च्या शेतकी अधिकाऱ्यास मारहाण,ऊस गाळपाचा वाद विकोपाला

नऊ जणांविरूध्द दिंद्रुड पोलिसात तक्रार

कमलेश जाब्रस

माजलगाव (जि. बीड) : तालुक्यातील आनंदगाव येथील शेतकरी सत्यप्रेम थावरे याचा ऊस गाळपास घेऊन जाण्यास जय महेश या खासगी साखर कारखान्याने (Jay Mahesh Sugar Mill) नकार दिल्याने या शेतकऱ्याने आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. या वादातूनच आज आनंदगाव येथे उसाच्या फडात जय महेश कारखान्याचे शेतकी अधिकारी सुजय पवार यांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला. याबाबत दिंद्रुड पोलिसात जय महेश कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली असुन अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील पवारवाडी (Majalgaon) येथील खासगी तत्वावरील जय महेश कारखान्याने आनंदगाव येथील ऊस उत्पादक शेतकरी सत्यप्रेम थावरे यांचा उस गाळपास नेण्यास नकार दिल्याने संबंधित शेतकऱ्याने आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे कारखाना प्रशासनाचे (Beed) अधिकारी, दिंद्रुड पोलिस उसाच्या फडात आज गेले असता अधिकारी व स्थानिक शेतकऱ्यांमध्ये झालेल्या वादातुन शेतकी अधिकारी सुजय पवार यांना नऊ लोकांनी मारहाण करत शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. यावेळी गंगाभिषण थावरे यांच्यासह शेतकरी घटनास्थळी होते. (Sugar Cane Farmers)

जय महेश साखर कारखान्यावर सत्यप्रेम थावरे या शेतकऱ्याची उसाची नोंद नाही. असे असतानाही कारखाना प्रशासनाने ऊस नेण्याची तयारी दर्शवली होती. प्रशासन नियमानुसारच ऊस गाळप करेल कुठल्याही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उसतोड यंत्रणेवरील दादागिरी खपवुन घेतली जाणार नाही. कारखान्यावर नोंद केलेल्या सर्वच शेतकऱ्यांचा उस कारखाना प्रशासन गाळप करणार आहे. शेतकी अधिकाऱ्यास मारहाणीचा प्रकार निंदनीय आहे.

- गिरीष लोखंडे, उपाध्यक्ष, जय महेश साखर कारखाना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT