file photo 
मराठवाडा

उद्या माळेगावत उधळणार बेलभंडार

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : दक्षीण भारतात प्रसिद्ध श्रीक्षेत्र माळेगाव (ता.लोहा) यात्रा उत्सव मंगळवार (ता.२२) उद्यापासून सुरु होत आहे. माळेगाव येथे श्री खंडोबारायाच्या भाविक, यात्रेकरूंना मुलभूत सुविधांसाठी प्रशासनाकडून उपाय योजना राबवण्यात आल्या आहेत. यात्रा उत्सवासाठी रविवारी (ता.२२) प्रशासनाच्या वतिने माळेगाव येथील विश्रामगृहात बैठक संपन्न झाली. 

जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा शांताबाई जवळगावकर व आमदार श्‍यामसुंदर शिंदे यांच्‍या प्रमुख उपस्थितीत झालेल्‍या बैठकीत जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्‍हा पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर, अप्‍पर जिल्‍हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, उप विभागीय अधिकारी पी.एस. बोरगावकर, तहसिलदार विठ्ठल परळीकर, अतिरिक्‍त जिल्‍हा पोलिस अधिक्षक बी. बी. राठोड, पोलिस उप अधिक्षक कांबळे, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा माळेगाव यात्रा उपसमितीचे सचिव व्‍ही.आर. कोंडेकर, गट विकास अधिकारी पी.पी. फांजेवाड, जिल्‍हा परिषद सदस्‍य चंद्रसेन पाटील, सरपंच बालाजी राठोड आदींची उपस्थिती होती.

यंत्रणेकडून घेतला आढावा 

जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा शांताबाई पवार जवळगावकर, आमदार श्‍यामसुंदर शिंदे व जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनी यावेळी विविध यंत्रणेच आढावा घेतला. माळेगाव यात्रेत यात्रेकरुंना मुबलक प्रमाणात शुध्‍द पिण्‍याचे पाणी, आरोग्‍य सुविधा व यात्रेतील स्‍वच्‍छता याविषयी संबंधीत अधिका-यांनी माळेगाव यात्रेत मुक्‍कामी राहून चोख व्‍यवस्‍था करण्‍याचे निर्देश आमदार श्‍यामसुंदर शिंदे यांनी दिले. राष्‍ट्रीय महामार्गावरील रस्‍ते दुरुस्‍ती, अग्‍नीशमन पथक, अश्‍व व पशुधनाच्‍या आरोग्‍याची काळजी, घोडा व गाढव लाईनमध्‍ये पाणी पुरवठा, यात्रेत विद्युत पुरवठा, केंद्र व राज्‍य शासनाच्‍या वतीने उभारण्‍यात येणारे विविध विभागांचे स्‍टॉल, कृषी व पशुप्रदर्शन आदी विषयाचा यावेळी आढावा घेण्‍यात आला. यात्रास्थळ स्वच्छतेसाठी महानगर पालिका, माहूर, देगलूर पालिकांचे एकून १०२ फिरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. 

सुरळीत पाणीपुरठ्यास यश: 
माळेगाव ग्रामपंचायतीकडे थकित विजदेयकामुळे विजवितरण कंपणीने लिंबोटी प्रकल्पातून राबवलेल्या पाणीपुरवठा योजनेचा विजपुरवठा खंडीत केला होता. मात्र, जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई जवळगांवकर, जिल्हाअधिकारी अरुण डोंगरे यांनी रविवारी वरिष्ठ प्रशासनाशी संवाद साधत पाणीपुरवठा योजनेचा विजपुरवठा पुर्ववत केला. त्यामुळे जलशुद्धीकरणाद्वारे यात्रास्थळावर स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा सुरु झाला आहे. 

चोख सुरक्षा व्यवस्था
 जिल्हा अधिकारी अरुण डोंगरे, पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर यांच्या निर्देशानुसार यात्रास्थळावर चोख पोलिस बंदोबस्तासह भाविक यात्रेकरुंच्या सुरक्षाव्यवस्थेसाठी दोन ड्रोन व यात्रास्थळावर जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. 

वाहतूक मार्गात बदल: 
माळेगाव यात्रा परिसरमधील वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून जिल्हाअधिकारी अरुण डोंगरे यांच्या आदेशाने नांदेड-लातूर मार्गात पर्यायी बदल करण्यात आला आहे. त्यानुसार लातूर कडे जाणारी जड वाहनं लोहा- पालम- राणीसावरगांव- अहमदपुर मार्गे लातूरला वळविण्यात आली आहेत. लातूरकडून नांदेडकडे येणाऱ्या वाहनांसाठीही तोच मार्ग असणार आहे. 

माळेगाव यात्रेतील विविध कार्यक्रम
मंगळवारी (ता.२४) श्रीक्षेत्र माळेगाव येथे श्री खंडोबाची पालखी व पूजन, ग्रामीण महिला व बालकांसाठी स्‍पर्धा, भव्‍य कृषी प्रदर्शन, विविध स्‍टॉलचे उद्घाटन व कृषीनिष्‍ठ शेतक-यांचा सपत्‍नीक सत्‍कार, बुधवारी (ता.२५) विविध स्‍पर्धा, पशु, अश्‍व, श्‍वान व कुक्‍कुट प्रदर्शन, गुरुवारी (ता.२६) श्री खंडोबा अश्‍व प्रदर्शन व कुस्‍त्‍यांची प्रचंड दंगल, शुक्रवारी (ता.२७) लावणी महोत्‍सव,  शनिवारी (ता.२८) पारंपारीक लोककला महोत्‍सव व विविध स्‍पर्धेचे बक्षीस करण्‍यात येणार आहे.

यात्रा यशस्वीतेची सर्व यंत्रणांची जबाबदारी 
श्रीक्षेत्र माळेगाव येथे भरणा-या श्री खंडोबा देवस्थान यात्रेची प्रशासनाकडून पूर्ण तयारी झाली आहे. यात्रा यशस्‍वी करण्‍याची सर्व यंत्रणांची संयुक्‍त जबाबदारी आहे, असे मत जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनी व्‍यक्‍त केले. श्री डोंगरे यांनी सर्व यंत्रणेतील अधिका-यांचा यावेळी आढावा घेतला. जिल्‍हा परिषद, लोहा पंचायत समिती व माळेगाव ग्राम पंचायत यांनी समन्‍वय ठेवून मंगळवार (ता.२४ ते २८) दरम्‍यान यात्रा कालावधीत चोख नियोजन करावे. सर्व यंत्रणांनी यात्रेत सहभागी होऊन जबाबदारीने कामे पारपाडावीत 

जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT