Ration Card
Ration Card 
मराठवाडा

लाभार्थी राहणार रेशनपासून वंचित

सकाळवृत्तसेवा

गेवराई - पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे अनेक लाभार्थी ऐन सणासुदीच्या दिवसातच रेशनपासून वंचित राहण्याची शक्‍यता आहे. ऑनलाइन ई-पॉस मशीनमध्ये अनेक तांत्रिक अडचणी असल्यामुळे व लाभार्थींचा अंगठा जुळत नसल्यामुळे धान्य मिळत नाही. रेशनकार्ड धारकांची दोन नावे असल्यामुळे स्वस्त धान्य दुकानातील धान्य काळे बाजारात विकले जात आहे.

आधार कार्ड योग्यरीत्या लिंक होत नसल्याचीही समस्या आहे. याकडे तहसीलदार व पुरवठा विभागाचे अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत.

तालुक्‍यातील लाभार्थींना स्वस्त दरात धान्य मिळावे, यासाठी शासनाने ऑनलाइन प्रणाली उपलब्ध करून दिली. याद्वारे लाभार्थींचे आधार लिंक करून ई-पॉस मशीनद्वारे अंगठा दिला तरच या महिन्याचे व पुढील महिन्याचे धान्य लाभार्थींना मिळते. मात्र, ही ऑनलाइन प्रणाली उपलब्ध करीत असताना लाभार्थी संख्या वाढविण्यासाठी एका लाभार्थ्याची दोन वेळेस नोंद करण्यात आली. 

या नोंदीमुळे लाभार्थींना ई-पॉस मशीनद्वारे अडचणी येत आहेत. एखाद्या लाभार्थीचा ई-पॉस मशीनशी अंगठा जुळला नाही, तर त्यास चालू महिन्याचे व पुढील महिन्याचे धान्य मिळत नाही. दुबार नोंदणी असल्यामुळे स्वस्त धान्य दुकानदाराला फक्त एकच लाभार्थीचे धान्य पोच केले जाते. दुसऱ्या नावाचे धान्य काळ्या बाजारात विक्री होत आहे. 

ऑगस्ट महिन्यात जेवढे ई-पॉस मशीनवर अंगठे जुळले तेवढेच धान्य ऑक्‍टोबर महिन्यात उपलब्ध झाले आहे. यामुळे अनेक सर्वसामान्य लाभार्थी ऐन सणासुदीच्या दिवसांतच स्वस्त धान्यापासून वंचित राहणार आहेत.

गैरप्रकार रोखण्याची गरज
गेवराईचे आमदार व तालुका दक्षता समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पवार हे स्वस्त दरात व योग्य वेळी धान्य उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करीत असतात; परंतु पुरवठा विभागातील ऑनलाइन प्रणालीद्वारे होत असलेला गैरव्यवहार रोखण्याकडे लक्ष देतील का, असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

पुरवठा विभागात स्वस्त धान्य वितरीत करीत असताना गैरप्रकार होत आहेत. याचबरोबर ते ऑनलाइन प्रणालीमध्ये लक्ष देत नसल्यामुळे गोरगरीब नागरिक यापासून वंचित राहत आहेत. यामुळे अनेक लाभार्थी सणासुदीच्या दिवसांत स्वस्त धान्यापासून वंचित राहणार आहेत. ऑनलाइन प्रक्रिया योग्य वेळी दुरुस्त न केल्यास व पुढील महिन्यात लाभार्थी वंचित राहिल्यास आंदोलन करण्यात येईल.
- राजेंद्र मोटे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT