Chikhlikar sir.jpg 
मराठवाडा

Video : मंत्र्यापेक्षा अधिकाऱ्यांचे काम चांगले.....काय आहे प्रकरण ते वाचा 

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातील जिल्हाधिकारी डॉ. विपीन तसेच पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर सध्या चांगले काम करत आहे. यामुळे त्यांच्यासमवेत रोजच बैठक घेवून त्यांना अडचणीत आनु नये. मी ही खासदार असल्यामुळे मलाही बैठक घेता येइल, असे खासदार चिखलीकर यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव न घेता टिका केली. 

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (ता. २३) ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भाजप महानगरअध्यक्ष प्रविण साले उपस्थित होते. कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनातील जिल्हाधिकारी त्यांच्या अधीनस्त यंत्रणेला सोबत घेवून चांगले काम करत आहेत. यामुळे आजपर्यंत जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही. सध्या एक रुग्ण आढळून आल्यावरही अधिकारी त्यावर चांगले काम करत आहेत. यामुळे त्यांच्या समवेत रोजच बैठक घेवून त्यांना अडचणीत आनु नये आपनही जिल्ह्याचा खासदार असल्यामुळे बैठक घेता येइल, परंतु आपण तसे केले नाही, असे खासदार चिखलीकर यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव न घेता टिका केली. 

लॅब आनल्याचे सांगणाऱ्यांनी पुरावे द्यावे
नांदेड येथे विद्यापीठातील कोरोना स्वॅब तपासणी लॅब मंजूरीसाठी आपण केलेल्या प्रयत्नाचे पुरावे माझ्याकडे आहेत. ज्यांनी लॅब मंजूरीसाठी प्रयत्न केले त्यांनी पुरावे सादर करण्याचे आव्हान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी विरोधकांना दिले. लॅब मंजूर झाल्यानंतर आपल्याला डॉ. दत्ता यांच्याकडून पत्र मिळाले. यानंतर कुलगुरु डॉ. उद्धव भोसले यांना पत्र आल्याचे ते म्हणाले. 

सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी किती निधी आनला
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण रस्त्यांच्या कामांना गती देण्याचे सांगत आहेत, परंतु त्यांनी बांधकाम मंत्री झाल्यावर किती रस्त्यांच्या कामांना मंजूरी दिली तसेच किती निधी आनला हे सांगावे, असे ते म्हणाले. भापज सरकारच्या काळातील रस्त्यांचे काम सध्या सुरु आहेत. हेही त्यांना माहित नाही. ते सत्तेत असताना सुरु झालेल्या भोकर रोडचे काम का सुरु झाले नाही, असा सवाल त्यांनी वेळी उपस्थित केला.

पंजाबचे यात्रेकरु त्यांच्या राज्यात परत जाणार 
गुरुव्दारात पंजाबमधील अडकलेल्या यात्रेकरुंना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी अनेकांनी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केले असतील. परंतु माझ्यामुळेच यात्रेकरु सुटले असे सांगणार नाही. आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीयमंत्री कौर यांच्या माध्यमातुन केंद्र सरकारकडे प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगीतले.           

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Road Inspection: गणेशोत्सवाच्या तोंडावर पुण्यात रस्ते दुरुस्तीचा बोजवारा; मिरवणूक मार्गांवर खड्डे, धोकादायक चेंबर अन् फुटपाथ

Palghar Bus Tragedy: शिवशाही बसच्या डिकीचे झाकण उघडताच शेतकरी सुभाष पागींचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Marathi News Live Updates: गणेशोत्सवाच्या तोंडावर रस्ते दुरुस्तीचा बोजवारा

Video: "इतका स्मार्ट दाखवलाय?" वैभव सूर्यवंशी 1980sचा Retro लूक पाहून शॉक; बुमराह, ईशान, श्रेयसनेही दिल्या भन्नाट रिअॅक्शन

Likhita Japa Sadhana: लिखित जपसाधना

SCROLL FOR NEXT