file photo
file photo 
मराठवाडा

खबरदार...! मटका, जुगार चालवाल तर.. 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी मटका व जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली. यावेळी सहा जणांना अटक करून त्यांच्याकडून ५६ हजार ४२० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याविरुध्द नायगाव, बिलोली आणि नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. ह्या कारवाया बुधवार (ता. ११) सायंकाळच्या सुमारास केल्या. 

नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्याच्या हद्दीत बळीरामपूर येथील एका झाडाखाली कल्याण नावाचा मटका बुकी गौत्तम किशन ससाने आणि अशोक किशन मुक्कावार हे दोघेजण चालवत होते. ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्या ठिकाणी कारवाई केली. यावेळी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मटका जुगाराचे साहित्य व रोख नऊ हजार २१० रुपये जप्त केले. पोलिस शंकर आशन्ना बिरमवार यांच्या फिर्यादीवरुन नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तपास पोलिस हवालदार रमाकांत कदम करीत आहेत.

येथे टच करा ---नांदेडात सात महिन्यात सातशेंना अटक
 
नायगावात मिलन ‘डे’

दुसऱ्या घटनेत नायगाव शहरातील सैलानी खीचडी हॉटेलच्या बाजूला बेकायदेशीररित्या मीलन डे नावाचा मटका सुरू होता. फौजदार भिमराव कांबळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह त्या ठिकाणी बुधवारी (ता. १२) दुपारी कारवाई केली. यावेळी शेख जावेद शेख सरदार (वय ३०) याला अटक केली. त्याच्याकडून १३ हजार २१० रुपयाचा ऐवज जप्त केला. फौजदार भिमराव कांबळे यांच्या फिर्यादीवरुन नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस हवालदार श्री. कंधारे करीत आहेत. 

बिलोलीत झन्ना- मन्ना जुगार

तर तिसऱ्या घटनेत बिलोली शहराच्या बाजूला तळ्याच्या पाळूवर चिंचेच्या झाडाखाली झन्ना-मन्ना नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती बिलोली पोलिस ठाण्याचे हवालदार लक्ष्मण कांबळे यांना मिळाली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह त्या ठिकाणी कारवाई करत विनोद वाघमारे, गजानन कुरडगे आणि अब्दुल हफीज अब्दुल मनान यांना अटक केली. डावावरून पोलिसांनी ३४ हजार रुपयाचा ऐवज जप्त केला. लक्ष्मण कांबळे यांच्या फिर्यादीवरुन बिलोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार श्री. वाडेकर करीत आहेत. 

अवैध धंदेचालकांमध्ये घबराट

जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी पुन्हा एकदा पोलिसांनी कंबर कसली आहे. शहर व जिल्ह्यात मटका, जुगार आदी अवैध धंदेवाल्याने आपले उखळ पांढरे करून घेण्यासाठी डोके वर काढले आहे. पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर आणि अतिरिक्त पोलिस अदिक्षक दत्ताराम राठोड यांनी आपल्या हद्दीतील सर्व अवैध धंदे बंद करण्याच्या सक्त सुचना ठाणेदारांना दिल्या आहेत. आपल्या हद्दीत असे अवैध धंदे आढळून आल्यास आपल्याविरुध्द कायदेशीररित्या कारवाई करण्यात येणार असल्याचे श्री. मगर आणि श्री. राठोड यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: पुनरागमन करताच मॅक्सवेलचा गुजरातला मोठा दणका! कर्णधार शुभमन गिलला धाडलं माघारी

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : एमके स्टॅलिन यांच्या पत्नीकडून तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT