BG-Kolse-Patil
BG-Kolse-Patil 
मराठवाडा

कोळसे पाटील यांनी नाकारला 'वंचित'चा पाठिंबा

सकाळवृत्तसेवा
औरंगाबाद - औरंगाबाद लोकसभेसाठी निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या नावाला एमआयएममधून तीव्र विरोध झाल्यानंतर त्यांनी जनता दल सेक्‍युलरकडून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला होता. यानंतरही जनता दल सेक्‍युलरला जागा सोडण्यास एमआयएम पदाधिकारी कार्यकर्ते तयार नव्हते, त्यामुळे ऍड. प्रकाश आंबेडकर यांना औरंगाबाद आणि मुंबईतील एक जागा एमआयएमला सोडावी लागली. त्यामुळे बी. जी. कोळसे पाटील यांनी रविवारी (ता.17) वंचित आघाडीचा पाठिंबा नाकारल्याची पोस्ट फेसबुकवर टाकली. 'मी वंचित बहुजन आघाडीचा बिनशर्त दिलेला पाठिंबा नाकारलेला आहे. कारण मी काल दुपारी माझे 1991 पासूनचे मित्र डॉ. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब यांच्याशी आदर्श महामानव डॉ. बाबासाहेब यांच्या अभ्यासिकेत बसून चर्चा केली. सर्व गुणदोषांसहित कॉंग्रेस पक्ष, जो की आज एकमेव पक्ष, जातीयवादी, विषारी विचारांच्या संघप्रणीत भाजपला रोखू शकतो, त्यांच्याबरोबर आघाडी करण्यासाठी शेवटचा; पण अनेक अयशस्वी प्रयत्नापैकी एक शेवटचा प्रयत्न केला,'' असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT