bhagat singh koshyari bhagat singh koshyari
मराठवाडा

'पाण्याच्या न्याय्य वापराने कृषी विकास साध्य व्हावा'

जिल्ह्यातील प्रकल्पीय सिंचन क्षमतेपैकी उरलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्राधान्य मिळाल्यास कृषी क्षेत्राला त्याचा लाभ मिळेल. त्यासाठी संबंधित विभागप्रमुखांनी कटिबद्ध राहून काम करावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले

सकाळ वृत्तसेवा

जिल्ह्यातील प्रकल्पीय सिंचन क्षमतेपैकी उरलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्राधान्य मिळाल्यास कृषी क्षेत्राला त्याचा लाभ मिळेल. त्यासाठी संबंधित विभागप्रमुखांनी कटिबद्ध राहून काम करावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले

परभणी: पाण्याचे प्रभावी, सूक्ष्म नियोजन व त्याचा न्याय्य वापर हा कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अधिक महत्त्वाचा भाग आहे. जिल्ह्यातील प्रकल्पीय सिंचन क्षमतेपैकी उरलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्राधान्य मिळाल्यास कृषी क्षेत्राला त्याचा लाभ मिळेल. त्यासाठी संबंधित विभागप्रमुखांनी कटिबद्ध राहून काम करावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विश्रामगृहात शुक्रवारी (ता.सहा) झालेल्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत राज्यपाल बोलत होते. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

प्रत्येक जिल्ह्यात स्वत:चे वैशिष्ट्य असलेले विशेष असे पीक, फळे, भाजीपाल्याचे वाण असते. असे पीक किंवा वाणांची आपल्या भौगोलिक वैशिष्ट्यांसह जीओ टॅगिंग केले तर त्याचा शेतकऱ्यांना लाभ होईल. कृषी उत्पादनात मूल्यवृद्धी साध्य करता येईल. यासाठी कृषी विद्यापीठ व संबंधित विभागाने विशेष प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षा कोश्यारी यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी गोयल यांनी सादरीकरणातून जिल्ह्याचा आढावा सादर केला.

ताफ्यातील वाहनाला अपघात-
हिंगोली : राज्यपालांच्या वाहनांच्या ताफ्‍यातील अग्निशमन दलाचे वाहन समोरील गाडीवर धडकल्याची घटना आज घडली. हिंगोलीतील आढावा घेऊन राज्यपाल कोश्यारी नर्सी नामदेव (ता. हिंगोली) येथे जात असताना हा प्रकार घडला. ब्रेक न लागल्याने अग्निशमन दलाच्या वाहन ताफ्यातील समोरच्या गाडीवर धडकले. ही गाडी पुढच्या वाहनावर धडकली. यात गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले. नर्सी भेटीनंतर राज्यपाल परभणीला रवाना झाले.

माहिती घेण्यासह देखरेखीचे राज्यपालांना अधिकार-
राज्यपालांनी हिंगोली जिल्ह्याचाही आढावा घेतला. हा जिल्हा आदिवासीबहुल आहे. अशा जिल्ह्यांत सिंचनाची कामे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शहरातील पाणीपुरवठा आदींची माहिती घेणे, देखरेख करण्याचे अधिकार संविधानाने राज्यपालांना दिले आहेत. याबाबत मंत्री, अधिकाऱ्यांसोबत बैठकीही होतात. त्या- त्या जिल्ह्यांत भेटी दिल्यास तेथील प्रश्न कळतात, असे कोश्यारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. इतर जिल्ह्यांपेक्षा हिंगोलीचे सिंचन क्षेत्र २५ टक्के कमी असल्याचे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari Defamation Case : इंस्टाग्रामवर नितीन गडकरी यांची बदनामी; आयटी सेलच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

Akola News : बिश्नोई गॅंगचा धक्कादायक खंडणी कॉल!आमदाराकडे २ कोटींची मागणी; भाजप शहराध्यक्षाला जीवघेणी धमकी

Amravati MD Drugs Seized : अमरावतीत महिन्याभरात तिसऱ्यांदा एमडी ड्रग्स जप्त ; तस्करीची पाळेमुळे खोलवर रुतलेली

Shiv Jayanti Mohol : मोहोळ तालुक्यात 40 ठिकाणी "एक गाव एक शिवजयंती" उपक्रम विविध मंडळांचा सामाजीक उपक्रमावर भर

Vasai Vasai News : वसईत सीरियल शूटिंग सेटला आग, स्टुडिओचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT