Bhalki Bhalki
मराठवाडा

भालकी हिरेमठ संस्थान करणार कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांचा संभाळ

महाराष्ट्र - कर्नाटक सीमाभागातील उदगीरपासून जवळच असलेल्या भालकी हिरेमठ संस्थानने त्यांच्या मठाच्या शिक्षण संस्थेतून आज पर्यंत असंख्य अनाथ मुलांचे संगोपन केले आहे

सचिन शिवशेट्टे

उदगीर (लातूर): देशभरात कोरोनाने (covid 19) थैमान घातले असून या रोगाचा संसर्ग होऊन आई-वडीलांचे निधन झालेल्या अनाथ मुलांना विनामूल्य शिक्षण, निवास आणि ते स्वावलंबी होण्यापर्यंतची सर्व व्यवस्था करण्यात येईल असे भालकी (जि. बिदर ) हिरेमठ संस्थानचे पीठाधिपती डाॅ. बसवलिंग पट्टद्देवरू यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्र - कर्नाटक सीमाभागातील उदगीरपासून जवळच असलेल्या भालकी हिरेमठ संस्थानने त्यांच्या मठाच्या शिक्षण संस्थेतून आज पर्यंत असंख्य अनाथ मुलांचे संगोपन केले आहे. गरीब , होतकरू मुलांना विनामूल्य शिक्षण, निवास व भोजनाची व्यवस्था केली असून हजारो मुला- मुलींचे जिवन घडवून स्वावलंबी बनवले आहे. मठ संस्थान महाराष्ट्र बसव परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात विविध कार्य केले आहे.

देशभरात कोरोना रोगाने थैमान घातले असून, सर्वत्र भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. दररोज हजारोंच्या संख्येने लोक मरण पावत आहेत. कामगार, शेतमजुर, कष्टकरी छोट्या- मोठ्या व्यवसायांवर अवलंबून असलेले कुटुंब हवालदिल झाले आहेत. योग्यवेळी उपचार न मिळाल्याने अनेक घरातील कर्ते आई-वडील यांचे निधन झाले आहे. अशा मुलांचे पूर्णत: संगोपन करण्याची जबाबदारी भालकी हिरेमठ संस्थान स्विकारणार आहे.

अधिक माहितीसाठी भालकी मठाचे नूतन मठाधिपती श्री गुरुबसव पट्टद्देवर (९६०६०६९३३३) मठाचे व्यवस्थापक मोहन रेड्डी (७३५३३०४५०२) महाराष्ट्र बसव परिषदेचे संचालक राजू जुबरे (८९०४६३८९०८) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन मठाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमार यांनी माफीचा साक्षीदार व्हावे! राहुल गांधींचा मोर्चाआधी मोठा इशारा, 'एसआयआर' मधील खरे गुन्हेगार दुसरेच..

IND vs NZ : भारतीय संघाला धक्का, स्टार फलंदाजाने लंगडत मैदान सोडले; न्यूझीलंड दौऱ्यासाठी उद्या होणार होता रवाना, पण...

Ladki Bahin Yojana Payment Update : ...तर खात्यात जमा होणार एकत्र 3000 रुपये? लाडकी बहीण योजनेच्या नव्या अपडेटने वाढवली उत्सुकता, नवरात्रीत लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार?

SCROLL FOR NEXT