हिंगोली : शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने सोमवारी (ता.२७) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 
मराठवाडा

Bharat Band : हिंगोलीत कृषी कायद्यांविरोधात धरणे आंदोलन

राजेश दारव्हेकर

हिंगोली : येथे शेतकरी विरोधी कृषी कायदे (Farm Bills) रद्द करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने सोमवारी (ता.२७) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन (Bharat Band) करण्यात आले. यावेळी माजी आमदार संतोष टारफे, काँग्रेसचे (Hingoli) जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, आर. आर. कोर्डे, बाबुराव गाडे, टी.के.टापरे, शेख खलील बेलदार, बापुराव बांगर, जिल्हा परिषद सदस्य सतीश पाचपुते, केशव नाईक, विलास गोरे, आबेदअली जहागिरदार, गोपाल ढोणे, किशनराव काशीदे , मनोहर जाधव यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने यावेळी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन दिले. निवेदनात शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करावेत, शेतीमालास किफायतशीर दीडपट भाव देऊन हमी भावाचा कायदा वीज विधेयक २०२० मागे घ्यावे, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर तसेच जीवनावश्यक वस्तुंची भाववाढ मागे घ्यावी सर्व गरजूंना अन्नसुरक्षा योजनेचे कार्ड द्यावे, कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये द्यावेत यासह विविध मागण्या निवेदनात नमुद करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT