jalana 
मराठवाडा

Bharat Bandh : जालन्यातील भोकरदनमध्ये काँग्रेसची रॅली

दीपक सोळुंके

भोकरदन (जालना) : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने आज सोमवारी (ता. 10) भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भोकरदन शहरात रॅली काढून व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन करण्यात येत आहे. या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही सहभागी झाले आहे.

देशात पेट्रोल, डिझेल, घरगुती वापराचा गॅस या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत आहेत. वारंवार होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. वाढत्या महागाईमुळे देशातील जनता त्रस्त झाली आहे. मात्र, महागाई कमी होण्याऐवजी वाढतच आहे. त्यामुळे या विरोधात सोमवारी देशव्यापी बंद पुकारण्यात आला असून, सोमवारी भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन विरोधी पक्षाच्या वतीने रॅली काढण्यात आली. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सदरील रॅली शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महाराणा प्रताप चौक, महात्मा फुले चौक, रोकडा हनुमान मार्गे सराफा मार्केट व मुख्य बाजारपेठ नवीन भोकरदन आदी भागातून रॅली काढण्यात आली. रॅली दरम्यान व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून बंदला संमिश्र प्रतिसाद दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricketer Retirement : चार वेळचा IPL चॅम्पियन खेळाडूची निवृत्तीची घोषणा! म्हणाला, 'आता खेळण्याला काहीच अर्थ नाही...'

Paithan Crime: पाचोडजवळ टोलवर राडा! वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला; आठ संशयित ताब्यात

Swing Accident: अभ्यासात हुशार, वडिलांच्या दुकानात मदतीचा हात; झोक्याच्या दुर्घटनेत ११ वर्षीय प्रथमेशचा मृत्यू

Lonavala Tourism: पाऊस पडतोय अन् मावळ सजतोय! धबधबे, घाट, किल्ले अन् धरणांचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Sugar Stock Limit: मिठाई विक्रेत्यांनो लक्ष द्या! साखर साठवणुकीचा नवा नियम, अतिरिक्त साठा ठेवल्यास कारवाई होणार, मर्यादा किती?

SCROLL FOR NEXT