Bharat Jodo Yatra  sakal
मराठवाडा

Bharat Jodo Yatra : भारत जोडो’ यात्रेत अंधांची दिंडी

पुसद येथील राष्ट्रीय दिव्यांग संघाचा कळमनुरीत सहभाग

विकास देशमुख

कळमनुरी : आमचा कुण्या पक्षाला विरोध नाही. भाजपची सत्ता गेली काय आणि कायम राहिली काय याचेही घेणे-देणे नाही. पण, आज आपला देश धर्म आणि जातीत विभागला जात आहे. धर्माच्या नावावर अनेकांना भुलवून द्वेषाचे विष पेरले जात आहे. एकूणच डोळे असूनही सगळे जण आंधळे होत आहेत. त्यांचे डोळे उघडण्यासाठी आम्ही ‘भारत जोडो’ यात्रेत भाग घेतला, असे सांगत होते पुसद येथून आलेल्या राष्ट्रीय दिव्यांग संघातील १५ अंध बांधव.

या अंध बांधवांची दिंडी शनिवारी कळनुरीत आली. त्यांनी ‘भारत जोडो’ यात्रेचे स्वागत केले. शिवाय यात्रेत सहभागही घेतला. यात्रेदरम्यान क्रांतीगीतांचे गायन केले. या अंधांना पुसद येथून आणण्यासाठी आणि पुसद येथे सुखरूप पोचविण्यासाठी त्यांना मदत केली ते सामाजिक कार्यकर्ते सदानंद तायडे यांनी. श्री. तायडे म्हणाले, ‘‘या यात्रेत सहभाग म्हणजे काँग्रेसला अंधाचा पाठिंबा आहे असे नाही.

पण, समाज एकसंध ठेवण्यासाठी यात आम्ही सहभागी झालो. येथे हिंदू आणि मुसलमांनी गुण्यागोंविदाने राहावे असेच आम्हाला वाटते. त्यासाठीच हा सहभाग आहे’’, असे त्यांनी अंधांच्या वतीने सांगितले. अंधाच्या या दिंडीत प्रवीण कठाळे, सोमनाथ अफून, प्रदीप खडसे, संतोष अंभोरे, अनंदा पांचाळ, आकाश अबुडारे, गुड्डू अबुडारे, कैलास यदुवंशी, हनुमान डाहाने, भीमराव पाईकराव, विनायक गाभणे आदी अंध बांधवांनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Politics : गोकुळ दूध संघाकडून शौमिका महाडिकांचे आरोप खोडून काढले, प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली माहिती

कोण आहे राकेश किशोर? वय ७२, म्हणे,'पश्चाताप नाही, मी तुरुंगात जाणं चांगलं'

Latest Marathi News Live Update : आमदार बापू पठारे धक्काबुक्कीप्रकरणी बंडू खांदवेसह २० जणांवर गुन्हा दाखल

Nagpur Cough Syrup Death : विषारी कफ सिरपमुळे नागपुरात १८ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, देशभरात मृतांचा आकडा १५ वर, प्रशासन अ‍ॅक्शनमोडवर...

ChatGPT Misuse : मित्राची वर्गातच हत्या कशी करायची? 'चॅटजीपीटी'ला विचारला प्रश्न, विद्यार्थ्याला खावी लागली तुरुंगाची हवा

SCROLL FOR NEXT