Bharat Jodo Yatra sakal
मराठवाडा

Bharat Jodo Yatra : ‘भारत जोडो यात्रे’ला २५० लेखकांचा पाठिंबा

मराठी लेखकांची राहुल गांधी यांच्याशी ५२ मिनीट चर्चा

विकास देशमुख

कळमनुरी : काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेत पुरोगामी साहित्यिकांची दिंडीही सहभागी झाली. या दिंडीत सहभागी २५० साहित्यिकांनी राहुल गांधी यांना पत्र देऊन भारत जोडो यात्रेला पाठिंबा दिला. यावेळी साहित्यिकांच्या शिष्टमंडळाशी शनिवारी दुपारी राहुल यांनी पार्डी मोड जवळ ५२ मिनीट चर्चा केली.

भाजपच्या धार्मिक विद्वेषाच्या राजकारणाविरोधात काँग्रेसने कन्याकुमारी ते काश्मिर अशी ३,५०० किलोमीटरची भारत जोडो यात्रा सुरू केली. गेल्या आठवड्यात ही यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. भारत जोडो यात्रेला बॉलिवूडमधून समर्थन मिळाल्यानंतर आता राज्यातील २५० लेखक आणि साहित्यिकांनी पाठिंबा दिला आहे. याशिवाय त्यांनी राहुल यांची भेट घेऊन त्यांना एक पत्रही लिहिले आहे. ही यात्रा हिंगोली जिल्ह्यात पोचल्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक दत्ता भगत, डॉ. जगदीश कदम, श्रीकांत देशमुख, लक्ष्मीकांत देशमुख, गणेश देवी, भगवंत क्षीरसागर, विजय वाकडे, अभिजित शेट्ये यांच्यासह अन्य काही लेखकांनी राहुल यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी देशातील राजकीय आणि सामाजिक विषयांवर चर्चा करत पदयात्रेला पाठिंबा दिला.

काँग्रेसचे धोरणही अमान्य

या चर्चेदरम्यान लेखकांनी अनेक विषय मांडले. यात काँग्रेस सोयीप्रमाणे हिंदूत्वाची भूमिका घेते. काँग्रेसचे हे सोयीचे हिंदूत्वही मान्य नसल्याचे लेखकांनी या चर्चेदरम्यान राहुल यांना स्पष्ट सांगितले. भारतीय राज्यघटनेने देशातील लोकांना स्वातंत्र्य आणि मूलभूत अधिकार दिलेले आहेत. परंतु, केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांमुळे आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा सातत्याने होत असलेल्या गैरवापरामुळे देशातील लेखक आणि साहित्यिकांना गुदमरल्यासारखं वाटत आहे. कलात्मक अभिव्यक्तीसाठी लेखकांना मुक्त स्वातंत्र्य आणि वातावरण हवे आहे, ते उपलब्ध करून देणं हे सरकारचं कर्तव्य आहे, असे म्हणत लेखकांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Train Viral Video : वा रे पठ्ठ्या ! थेट ट्रेनच्या एसी डब्यातच थाटले पानाचे दुकान, अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

स्मृती मानधनाचा कर्णधार म्हणून आज पहिला सामना! दुसरीकडे भारताच्या स्टार महिला क्रिकेटपटूची अचानक निवृत्ती...

Woman Minister Husband Controversy : महिला मंत्रीच्या पतीचा इंग्लिश नजराणा, अनेकांसोबत ठेवले संबंध; मंत्री पत्नीला ठार करण्याचा रचला कट

Marathi News Live Updates: तिरंगा फडकवण्याच्या आवाहनानंतर दिल्लीतील टॉलस्टॉय मार्ग परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

Petrol Diesel Price Today: सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोल-डिझेलच्या टॅक्समध्ये बदल; महाराष्ट्रात 1 लिटरचा भाव किती?

SCROLL FOR NEXT