Rahul gandhi and Aaditya Thackeray Sakal
मराठवाडा

भारत जोडो यात्रा कॉंग्रेसची, शक्ती प्रदर्शन ठाकरे गटाचे

भारत जोडो यात्रेत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनीही शुक्रवारी सहभाग घेतला.‌

विकास देशमुख

भारत जोडो यात्रेत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनीही शुक्रवारी सहभाग घेतला.‌

भाटेगाव (ता. कळमनुरी) - या यात्रेत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनीही शुक्रवारी (ता. ११) सहभाग घेतला.‌ यात्रेचे हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करताच शिवसैनिकांनी यात्रेचे जोरदार स्वागत केले. दरम्यान, शिंदे गटाचे हिंगोली जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांच्या कळमनुरी मतदार संघातून यात्रा जात असताना शिवसेनेने (ठाकरे) शक्तिप्रदर्शन केले.

माजी खासदार वानखेडे आणि कार्यकर्त्यांनी हिंगोली जिल्ह्याच्या सीमेपासून खांद्यावर भगवे झेंडे घेऊन चालायला सुरुवात केली. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार बांगर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आदित्य ठाकरे यांनी यात्रेत चालण्यासाठी कळमनुरी विधानसभा मतदार संघातील रस्त्याची‌ निवड केली. त्यामुळे जणू ठाकरे गटाने बांगर यांना आव्हान दिले.

राहुल गांधींच्या अंगावर गुलाल

शिवसैनिकांनी यात्रेदरम्यान राहुल गांधी यांच्या अंगावर गुलाल टाकला. एकूणच आमदार बांगर यांच्या कळमनुरी मतदार संघात यात्रेनिमित्त ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test: पडिक्कलने सलग दुसरं शतक करत ८ वर्षांचा दुष्काळ संपवला! शुभमन गिलचीही फिफ्टी, पहिल्या दिवसावर भारताचे वर्चस्व

तरुणांच्या मुद्द्यावर CJP पुन्हा आक्रमक; केंद्राच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह, आंदोलनाचा इशारा

लायब्ररीच्या वॉशरूममध्ये भिंतीला छिद्र, मोबाइल कॅमेरा लावून विद्यार्थिनींचे व्हिडिओ अन्...; मालकाच्या मुलाचं विकृत कृत्य

Dilip Walse Pati: अंगणवाडीच्या पोषण आहारावर गंभीर प्रश्न! दर्जाची निष्पक्ष चौकशी करा, दोषींवर कारवाई करा; वळसे-पाटील आक्रमक

Latur Crime: चाकूरमध्ये पहाटे महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावले; चाकूचा धाक दाखवत १ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास

SCROLL FOR NEXT