Road-Work
Road-Work 
मराठवाडा

बिडकीन - वेळेच्या दोन पावले पुढे!

आदित्य वाघमारे

औरंगाबाद - दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या माध्यमातून बिडकीन येथे उभारण्यात येत असलेल्या महाकाय औद्योगिक शहरात पहिल्या टप्प्यातील (१००६.४ हे.) पायाभूत सुविधा उभारण्याचे काम जोमात आहे. निर्धारित वेळेच्या दोन पावले पुढे सुरू असलेल्या या कामातून सुमारे बारा किलोमीटरचे डांबरीकरण, तर पंधरा किलोमीटर रस्त्यांचे मजबुतीकरण पूर्ण झाले आहे. सुविधांचे काम सुरू असतानाच हे डेस्टिनेशन उद्योगांनाही खुणावू लागले आहे. तीन टप्प्यात सुरू होणाऱ्या या शहराचा पाहिला टप्पा जवळपास निम्मा पूर्ण झाला आहे.

‘मेगा इंडस्ट्रियल पार्क’ शोभावा असा औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीचा बिडकीन नोड भासू लागला आहे. डीएमआयसीच्या शेंद्रा नोडमध्ये उद्योगांच्या गुंतवणुका येत असताना एप्रिल २०१८ मध्ये बिडकीन नोडमधील पायाभूत सुविधांच्या कामाला औपचारिक आरंभ करण्यात आला. पायाभूत सुविधांची उभारणी जुलै २०१९ पर्यंत करण्याची डेडलाइन देण्यात आली आहे. मात्र, हे काम किमान दोन महिने अगोदर संपेल अशी अपेक्षा औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिपला आहे. जपानी उद्योग फुजी सिल्व्हेरटेकने याच वसाहतीत आपला १०० कोटींचा उद्योग उभारण्याचे निश्‍चित केले आहे.

पहिल्या टप्पा... (हेक्‍टर)
औद्योगिक -     ३७८.७
रहिवासी -     २२१.५
व्यावसायिक -     ९९.४
सुविधा -     ५९.४
खुली जागा -     ८३.१
रस्ते -      १६४.४

बिडकीन औद्योगिक शहराच्या उभारणीसाठी आवश्‍यक असलेली संपूर्ण जागा ताब्यात आहे, असा हा देशातील एकमेव प्रकल्प आहे. एव्हीएशन आणि ऑटोमोबाईलसाठी काम करणाऱ्या कंपन्यांनी याचा विचार करावा. मोठ्या प्रकल्पांसाठी बिडकीन ‘आयडीएल डेस्टिनेशन’ म्हणून उभे राहत आहे. 
- गजानन पाटील, सहसरव्यवस्थापक, एआयटीएल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

SCROLL FOR NEXT