Bidkin sakal
मराठवाडा

Bidkin: निर्भय महाराष्ट्र पार्टीचे वतीने खड्डे पुजन आंदोलन; रस्तात पडलेल्या खड्डे बुजविण्याची मागणी..!

Latest Marathi News: वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे.

सकाळ वृत्तेसवा

रविंद्र गायकवाड

Marathwada: येथील निलजगाव फाटा ते शेकटा फाटा परिसरातील मागील काही महिन्यांपासून समांतर जलवाहिनीच्या कामाला सुरुवात झाली असुन जलवाहिनी चे काम मोठ्या कासवगतीने सुरू आहे.बिडकिन- पैठण, छत्रपती संभाजीनगर या रोडवर समांतर जलवाहिनीच्या कामामुळे रस्त्याची चाळणी झाली असून मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत.या खड्ड्यात मोठ्या प्रमाणावर चिखल झाला असल्याने वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे.

मागील तीन दिवसांपासून निर्भय महाराष्ट्र पार्टीचे वतीने खड्डात जाऊन कंत्राटदार व महानगरपालिका यांना हा प्रकार दाखविण्याचा प्रयत्न केला होता.मात्र काल रात्री मुजोर कंत्राटदारांच्या वतीने रस्त्यावर झालेल्या खड्ड्यात मुरुम व माती एकत्र करुन तात्पुरती मलमपट्टी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

काल रात्री पासुन याच खड्ड्यात दोन दुचाकी व दोन चारचाकी सह इतर वाहने मोठ्या चिखलात अडकलेली स्थितीत नागरिकांच्या वतीने बाहेर काढण्यात आले असल्याचे चित्र दिसत आहे.

वारंवार कंत्राटदार व महानगरपालिका यांना सांगितले जात असुन हि कुठल्याही प्रकारची कामे व रस्ता दुरुस्ती करण्यात आली नाही.याबाबत निर्भय महाराष्ट्र पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि सदस्य यांनी खड्ड्यांची हार व गुलाल उधळून पुजा करत कंत्राटदार व महानगरपालिका अधिकारी यांचा निषेध व्यक्त केला आहे.

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे वतीने खड्ड्यांचे पुजन

मागील दोन दिवसांपासून निर्भय महाराष्ट्र पार्टीचे पदाधिकारी व सदस्य रस्ता व खड्ड्यांचे माहेरघर बनलेल्या परिस्थितीत लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी याकरिता वारंवार सोशल मिडियावर याबाबत चे व्हिडिओ व्हायरल करत वाहनधारक व नागरिकांना मदत करत असताना काल कंत्राटदारांच्या वतीने खड्डे भरले मात्र सर्व खड्ड्यात माती मिश्रित मुरुम असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहने अडकत आहेत.

आज निर्भय महाराष्ट्र पार्टीचे छत्रपती संभाजी नगर जिल्हा संपर्कप्रमुख पांडुरंग देविदास,पैठण तालुका संपर्कप्रमुख विष्णू काळे,बिडकीन शहर प्रमुख रामनाथ चौधरी,सदस्य गणेश हिवाळे आदींच्या वतीने खड्ड्यांचे हार व गुलाल उधळून पुजन करण्यात आले.

कंत्राटदार व महानगरपालिका अधिकारी यांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी निर्भय महाराष्ट्र पार्टीचे वतीने देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT