Patient Old Women sakal
मराठवाडा

Bidkin News : रुग्णालयात तब्बल ०२ तासांपेक्षा जास्त वेळ रुग्ण रुग्णवाहिकेच्या प्रतिक्षेत..

वयोवृद्ध महिलेला तब्बल दोन तास रुग्णवाहिका सेवा न मिळाल्याने खासगी रुग्णवाहिकेतून उपचारासाठी पुढे हलविण्यात आल्याची घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

- रविंद्र गायकवाड

बिडकिन - येथील ग्रामीण रुग्णालय ६२ वर्षीय वयोवृद्ध महिलेला तब्बल दोन तास रुग्णवाहिका सेवा न मिळाल्याने खासगी रुग्णवाहिकेतून उपचारासाठी पुढे हलविण्यात आल्याची घटना काल (ता.२२) रोजी अंदाजे ०७ ते ७:३० या वेळेत घडली.

बिडकिन येथील आलिया अब्दुल्ला चाऊस (वय-६२ वर्षे), रा. चाऊस गल्ली, बिडकिन. ता.पैठण असे रुग्ण वयोवृद्ध महिलेचे नाव आहे. ग्रामीण रुग्णालयात अति उच्च रक्तदाब आणि तीव्र मधुमेह आजाराची तीव्रता वाढली असल्याने दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय अधिकारी यांनी रुग्ण चाऊस या वयोवृद्ध महिलेला प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात यावे, असा सल्ला दिला होता.

ग्रामीण रुग्णालयातील रूग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांच्या वतीने तब्बल दोन तास रुग्णवाहिका सेवा १०८ ला वारंवार फोन केला होता. परंतु रुग्णवाहिका सेवा टोल फ्री क्रमांक १०८ ही सेवा कधी नॉट रिचेबल, कधी संपर्क क्षेत्राच्या बाहेर, कधी फोन उचलुन बाजुला ठेवणे, कधी फोन लागत नसल्याचे ही नातेवाईकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

तब्बल दोन तास रुग्णवाहिका सेवा न मिळाल्याने परिसरातील खासगी रुग्णालयांमध्ये असलेल्या रुग्णवाहिकेतून पुढिल उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कधी काळ अंत्यत तातडीने सेवा मिळत असलेल्या १०८ रुग्णवाहिका सेवा हा भोंगळ कारभारामुळे अनेक प्रश्न निर्माण होताना दिसत आहे. तसेच रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळण्याचे काम हि सूरु आहे असे नातेवाईकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

रुग्णवाहिका सेवा क्रमांक १०८ च्या वरिष्ठ अधिकारी, रुग्णवाहिका टॉल फ्री क्रमांक सेवा, रुग्णवाहिका चालक आणि रूग्णवाहिका वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी रुग्ण व नातेवाईक आणि नागरिकांच्या वतीने केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT