Lathicharge On Maratha Reservation Protesters Jalna Esakal
मराठवाडा

Lathicharge On Maratha Reservation Protesters Jalna: जालन्यातील घटनेनंतर शरद पवार आणि उध्दव ठाकरेंचा मोठा निर्णय; आंदोलकांना भेटून...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उध्दव ठाकरे शनिवारी जालना दौऱ्यावर, आंदोलकांची घेणार भेट

अंकिता खाणे (Ankita Khane)

जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये गेल्या चार दिवसांपासून उपोषण करत असलेल्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी काल (शुक्रवारी) लाठीचार्ज केल्याची घटना घडली. या घटनेमुळे आंदोलकांनी आक्रमक होऊन पोलिसांवर दगडफेक सुरु केली. परिसरात मोठ्या प्रमाणवार जाळपोळ झाली. यामध्ये काही आंदोलक आणि पोलीस देखील जखमी झाले आहेत. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणंही चांगलंच तापल्याचं दिसून आलं.

सकाळी अंतवरली सराटी गावामध्ये जाऊन छत्रपती संभाजीराजे यांनी आंदोलकांची भेट घेतली. या घटनेमध्ये जखमी झालेल्यांची भेट घेतली. रूग्णालयात जाऊन त्यांची चौकशी केली. तर या प्रकरणावर विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत आहेत. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे आज त्या गावांमध्ये जाऊन आंदोलकांची भेट घेणार आहेत. त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावाला भेट देणार आहेत. तसेच अंबड रुग्णालय भेट देऊन जखमींची विचारपूस करणार आहेत. त्याचबरोबर ते पत्रकार परिषद देखील घेणार आहेत.

त्याचबरोबर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज संध्याकाळी अंबड आणि आंतरवाली सराटी गावांना भेट देणार आहेत. मराठा आरक्षणासाठी आंदोलनकर्ते मराठा कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. कालच पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे मराठा समाजात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. उद्धव ठाकरे पोलिसांच्या लाठीमारात जखमी झालेल्याची अंबड शासकीय हॅास्पिटलमध्ये जाऊन भेट घेणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6 Update : 'चुकीचं कास्टिंग' ते 'रील स्टार्सची भरती'; यंदाच्या सिझनवर प्रेक्षक व्यक्त !

Beed News: सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर! फाटकासाठी थांबतेय रेल्वे; प्रवाशांचा जीव टांगणीला, अहिल्यानगर-बीड रेल्वेसेवेतील नियोजनाचा बोजवारा..

Latest Marathi News Live Update : अंकुश नगर खून प्रकरणातील फरार आरोपीला अटक

'बिग बॉस मराठी ६'च्या रणधुमाळीत कलर्स मराठीने केली नव्या मालिकेची घोषणा; 'या' हिंदी मालिकेची आहे कॉपी; प्रोमो पाहून प्रेक्षकांनी ओळखलं

Kolhapur Election : मिसळ पे चर्चेत विकासाचा अजेंडा; महायुतीचा जाहीरनामा जीवनमान बदलणारा, मूलभूत सुविधा देऊन कोल्हापूर घडवणार – आमदार क्षीरसागर

SCROLL FOR NEXT