file photo 
मराठवाडा

मोठा अनर्थ टळला : गॅस गळती होऊन घराला आग; पाचजण जखमी, कळमनुरी येथील घटना

संजय कापसे

कळमनुरी ( जिल्हा हिंगोली ) : स्वयंपाकाचा गॅस लीकेज झाल्यामुळे घराला आग लागली. यावेळी घरामध्ये असलेल्या कुटुंबियांना बाहेर काढण्यासाठी मदतीसाठी गेलेल्या युवकासह पाच जण जखमी झाल्याची  घटना शनिवार (ता. तीन)  दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. 

या आगीमध्ये घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. अग्निशमन दलाच्या वाहनाने आग आटोक्यात आणली. कळमनुरी येथील आठवडी बाजार परिसरात रामभाऊ चापटे हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहेत. शनिवार दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांची पत्नी संगीता चापटे यांनी गॅस सिलेंडर संपल्यामुळे जुने सिलेंडर काढून नवीन गॅस सिलेंडर लावले. सिलेंडर व्यवस्थित लागले की नाही हे पाहण्यासाठी त्यांनी गॅस शेगडी लावून पाहण्याचा प्रयत्न केला असताना अचानक गॅस शेगडीने पेट घेतला.

या घटनेने घाबरलेल्या चापटे कुटुंबीयांनी आरडाओरड केली. तोपर्यंत गॅस शेगडीपर्यंत लिकेज असलेल्या पाईपने आग पकडली.
आगीने रौद्ररूप धारण करताच शेजारी राहणाऱ्या शेख मेराज शेख खलील या युवकाने घरामध्ये धाव घेऊन घरामधील चापटे कुटुंबातील सदस्यांना बाहेर काढण्यासाठी मोठी मदत केली. मात्र आगीच्या झळा लागून रामभाऊ चापटे (वय ४१), संगीता चापटे (वय ३५), वैष्णवी चापटे (वय १४), प्रणव चापटे (वय १५) व मदतीसाठी धावणारा शेख मेराज शेख खलील (वय २०) हे या आगीमध्ये जखमी झाले. यावेळी उपस्थित नागरिकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवले.

घटनास्थळी पोलिस निरीक्षक रणजीत भोईटे, दादासाहेब कांबळे, रामचंद्र जाधव, सूर्यकांत भारशंकर, प्रशांत शिंदे, यांनी ही धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच तातडीने पोहोचलेल्या पालिकेच्या अग्निशमन दलाचे वाहन व नागरिकांच्या मदतीने घराला लागलेली आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत या घरामधील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. जवळपास दीड लाख रुपयांची संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. याप्रकरणी पोलिस व महसूल विभागाच्या वतीने घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. दरम्यान या घटनेत जखमी झालेल्या पाचही व्यक्तीवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार संतोष बांगर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत जखमींची विचारपूस केली.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meghalaya Minister Resignations: मेघालयमध्ये राजकीय हालचालींना वेग; 12 पैकी आठ मंत्र्यांचे राजीनामे; जाणून घ्या, नेमकं कारण?

मोदी सरकार हिंदू-मुस्लिम कार्ड खेळतंय... राहुल गांधी सकारात्मक विचाराचे! Shahid Afridi च्या विधानाचा BJP कडून समाचार

Latest Marathi News Updates : परभणीत पूरस्थिती; शिवसेनेकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात

Bigg Boss 19 : बिग बॉस 19 मध्ये दोन स्पर्धकांनी घातला राडा; कायमचे झाले नॉमिनेट, काय घडलं नेमकं जाणून घ्या

Hingoli News : चार वर्षानंतरच्या मुहूर्ताला पालकमंत्र्यांचा खोडा; शिक्षक पुरस्काराचे वितरण पुढे ढकलले

SCROLL FOR NEXT