मराठवाडा

IT Raid In Jalna : 390 कोटींची माया जप्त; कारवाईसाठी 'दुल्हल हम ले जायेंगे'चा कोड

सकाळ डिजिटल टीम

IT Raid In Jalana : आयकर विभागाने जालन्यामध्ये छापेमारी करत मोठी रक्कम जप्त केली असून, एका स्टील कारखाना आणि त्याच्या मालकाच्या घरावर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे 390 कोटींची माया जप्त करण्यात आली आहे. यामध्ये 58 कोटींची रोकड, 32 किलो सोन्याचे दागिने, हिरे, मोती असा 16 कोटींचा ऐवज तसेच सुमारे 300 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेच्या कागदपत्रांसह महत्त्वाचा दस्तऐवज जप्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. जप्त करण्यात आलेली रक्कम अधिकाऱ्यांना मोजण्यासाठी तब्बल 13 तास लागल्याचे समोर आले आहे. छापेमारीसाठी जाताना आयकर विभागाच्या गाड्यांवर दुल्हन हम ले जायेंगे असा आशय असल्याचे स्टीकर लावण्यात आले होते.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी साधारण 1 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट दरम्यान चौकशी केली होती. त्यानंतर मोठी कारवाई करण्यात येणार असल्याची कुणकुण होती. या कारवाईमध्ये औरंगाबादमधील एका प्रख्यात लँड डेव्हलपर आणि व्यापाऱ्याचाही समावेश आहे. 1 ते 8 ऑगस्टपर्यंत चाललेल्या या कारवाईसाठी नाशिक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यभरातील 260 अधिकाऱ्यांसह कर्मचारी 120 हून अधिक वाहनांच्या ताफ्याद्वारे जालन्यात पोहोचले होते.

‘दुल्हन हम ले जायेंगे’चे वाहनांवर लावले स्टिकर

जालना आणि औरंगाबाद येथे आयकर विभागाने केलेल्या कारवाईदरम्यान छापे टाकण्यात येणाऱ्या व्यक्तींना याची कल्पना येऊ नये यासाठी नाशिक, पुणे, ठाणे व मुंबईच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वाहनांवर दुल्हन हम ले जायेंगे असे स्टीकर लावले होते. जेणे करून हे सर्व लग्नाला जात असल्याचे भासवण्यात आले. यातील काही गाड्यांवर वर आणि वधूच्या नावांचे स्टीकर लावण्यात आले होते.

कुठे सापडली रक्कम

आयकर विभागातर्फे करण्यात आलेल्या या कारवाईत अधिकाऱ्यांना कपाटांखाली, बिछान्यांमध्ये तसेच अडगळीतील काही पिशव्यांत रोकड सापडून आली आहे. सुरुवातील अधिकाऱ्यांना काही आढळून आले नाही. मात्र, त्यानंतर अधिकाऱ्यांना कारवाईचा मोर्चा शहराबाहेरील आठ ते दहा किलोमीटरवरील फार्महाऊसकडे मोर्चा वळवला. त्यावेळी तेथे कपाटांखाली, बिछान्यांमध्ये तसेच अडगळीतील काही पिशव्यांत रोकड सापडली.

जालन्यातील या कारवाईमध्ये स्टील तीन व्यवसायिकांकडेरोख रकमेसह सोन्याचे दागिने, बिस्किटे, नाणी, हिरे आढळून आले असून, सोन्याच्या 32 किलो दागिन्यांची बाजारभावानुसार किंमत 16 कोटी रुपये आहे. याशिवाय अधिकाऱ्यांनी व्यावसायिकांच्या घरं, कार्यालयांसह विविध ठिकाणांहून महत्त्वाची कागदपत्र जप्त केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election: भारताच्या निवडणुकीत अमेरिका खरंच हस्तक्षेप करत आहे का? वाचा, रशियाच्या आरोपावर अमेरिकेने काय दिले उत्तर

Gold Investment: सोन्याचे भाव भिडले गगनाला.. अक्षय तृतीयेला सोने खरेदी करावी का? तज्ज्ञ काय सांगतात

Accident News: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; 3 जणांचा जागीच मृत्यू, ८ जखमी

Pre-monsoon Rain : महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांत आज बरसणार पूर्वमोसमी पावसाच्या सरी; नागपूर, भंडारा, गोंदियात गारपिटीचा इशारा

Akshaya Tritiya 2024 : आजच्या दिवशी सोन्यात केलेली गुंतवणूक देईल जास्त फायदा; कशी कराल डिजिटल खरेदी!

SCROLL FOR NEXT