Accident sakal
मराठवाडा

Devgaon Rangari Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी (ता. चार) छत्रपती संभाजीनगर नाशीक मार्गावर देवगाव रंगारी गांवाजवळ घडली.

संतोष गंगवाल

देवगांव रंगारी - अज्ञात वाहनाच्या धडकेत एक दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी (ता. चार) छत्रपती संभाजीनगर नाशीक मार्गावर देवगाव रंगारी गांवाजवळ घडली. शिवाजी कान्हु जाधव (वय-५७) राहणार चांभारवाडी, ता. कन्नड असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, शिवाजी कान्हु जाधव हे शुक्रवारी सकाळी पुणतांबा येथे औषध आणण्यासाठी गेले होते. तेथुन संध्याकाळी देवगांव रंगारी येथे आले व येथुन आपल्या दुचाकीवर (क्रमांक एम. एच. २० बी आर ७९१४) आपल्या गावी चांभारवाडीकडे जात असतांना येथील पंचवटी हॉटेलच्या पुढे गेल्यानंतर मागुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ते जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक रमेश चव्हाण व पोलीस कर्मचारी, ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले.

प्रेत उत्तरीय तपासणीसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. दरम्यान, शिवाजी कान्हू जाधव यांच्या मागे पत्नी, 2 मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे. याबाबत देवगांव रंगारी पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, ३ दिवसात ३ रुपयांनी झाला महाग

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा तर कोकणात पावसाचा इशारा

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चे ठेका धरायला लावणारे टायटल साँग प्रदर्शित; अवधूत गुप्तेंच्या आवाजात स्वरबद्ध

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

SCROLL FOR NEXT