file photo 
मराठवाडा

पिंपरी येथील कोंबड्याचा  मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचे स्पष्ट, कृष्णापुर येथेही दहा कोंबड्या दगावल्या

राजेश दारव्हेकर

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील पिंपरी खुर्द येथे दगावलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले असुन तसा अहवाल प्राप्त झाला आहे. तसेच येथून जवळच असलेल्या कृष्णापूर येथेही कोंबड्या दगावल्याने आता जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

परभणी पाठोपाठ हिंगोली जिल्ह्यात देखील बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट होत आहे. कळमनुरी तालुक्यातील पिंपरी खुर्द येथे तीन ते चार दिवसापुर्वी  ३४ पैकी २४ कोंबड्या दगावल्या होत्या त्यानंतर या परिसरातील क्षेत्र अलर्ट झोन म्हणून जाहीर केला. तसेच दक्षता पथकाची स्थापना करून त्यानुसार पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पवार, जिल्हा पशुधन अधिकारी डॉ. जावळे यांनी गावात जाऊन पाहणी केली. मृत्यूमुखी पडलेल्या कोंबड्यां पैकी पाच कोंबड्याचे नमुने भोपाळ येथे तपासणीसाठी पाठवले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून यात या कोंबड्यांना स्ट्रेनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

यामुळे खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पिंपरी खुर्दच्या एक किलोमीटर अंतरावर  पक्षी नष्ट केले जाणार असल्याचे सांगितले. तसेच आता खबरदारी म्हणून जिल्ह्यात पक्ष्यांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. दरम्यान कोंबड्यांचा मृत्यू झाल्यास जवळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात कळविण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तसेच  सर्वेक्षणही हाती घेतले आहे. जिल्ह्यात २१ पोल्ट्री फाँर्म आहेत. त्यात एक लाख ६२ हजार पक्षी असल्याचे सांगण्यात आले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT