crawcraw
crawcraw 
मराठवाडा

Bird Flu: लातूररोड येथे 6 कावळ्यांचा मृत्यू; गावकऱ्यांत भीती

प्रशांत शेटे

लातूररोड (लातूर): येथे वेगवेगळ्या ठिकाणी सहा कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. ही बाब बुधवारी (ता.१३) सकाळी गावकऱ्यांना निर्दशनास आली.यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. कावळ्यांचा मृत्यु बर्ड फ्लुने झाला की अन्य कारणाने हे अद्याप स्पष्ट नसले तरी प्रशासनाच्या वतीने योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहे.

लातूररोड गावात वेगवेगळ्या ठिकाणी पाच कावळे मृत्युमुखी पडलेले दिसून आले, तर तहसील कार्यालयाच्या जवळ एक कावळा मृत अवस्थेत आढळला आहे. गावकऱ्यांनी याची माहिती तहसीलदार डाॅ. शिवानंद बिडवे यांना दिल्यानंतर त्यांच्यासह नायब तहसीलदार शेषेराव टिप्परसे, चाकूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदीवे, माजी सरपंच मधुकर मुंडे यांनी घटनास्थळी भेट दिली मृत कावळे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने तपासणीसाठी लातूर येथे पाठविले आहेत.

नेमके या कावळ्यांचा मृत्यु बर्ड फ्लुने झाला की अन्य कारणाने हे अद्याप स्पष्ट नसले तरी प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेतली जात आहे.गावाच्या जवळपास असलेल्या सर्व पोल्ट्री फार्मची तपासणी करण्यात आली आहे.देशात सर्वत्र बर्ड फ्लुने डोके वर काढले असताना अचानक या कावळ्याच्या मृत्युमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

कावळ्याच्या मृत्युचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जाणार असून तहसील कार्यालयात पशुधन विकास अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन सुचना दिल्या आहेत. डाॅ. शिवानंद बिडवे, तहसीलदार, चाकूर

(edited by- pramod sarawale) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad T20 World Cup 2024 : टीम इंडियाची घोषणा! वर्ल्ड कप जिंकण्याची जबाबदारी 'या' मावळ्यांच्या खांद्यावर, जाणून घ्या संपूर्ण संघ

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

UK Video: हातात तलवार घेऊन तो लंडनच्या रस्त्यावर फिरत होता, 2 पोलिसांसह अनेकांना भोसकले, पाहा व्हिडिओ

Lok Sabha Election: ठाकरे गटाला खिंडार! वैशाली दरेकरांनी उमेदवारी अर्ज भरताच ठाकरे गटातील धुसफूस बाहेर

Latest Marathi News Live Update : भाजप पुन्हा सत्तेत आल्यास ते राज्यघटना फेकून देतील, राहुल गांधी यांचा आरोप

SCROLL FOR NEXT