BJP Agitation Latur Municipal Corporation 
मराठवाडा

पाण्यासाठी भाजपचा लातूर महापालिकेत ठिय्या, सतरा दिवसांपासून निर्जळी

हरी तुगावकर

लातूर ः महापालिकेने वीज बील न भरल्याने लातूरला पाणी पुरवठा करणाऱया सर्वच योजनेचा पाणीपुरवठा योजनेची वीज महावितरणन तोडली आहे. याला आता सात दिवस होत आहेत. सध्या शहराला दहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात ही सात दिवस वीज तोडल्याने सतरा दिवसांपासून शहरात निर्जळी आहे. महापालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाला सोमवारी (ता.२४) जाग आली. महापालिकेने तातडीने पाणीपुरवठा सुरु करावा या मागणीसाठी त्यांनी सोमवारी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. त्यात उपायुक्त संभाजी वाघमारे यांनी नागरिक कर भरणा करीत नसल्याने वीज भरले गेले नाही अशी माहिती दिल्यानंतर भाजपचे नगरसेवक संतप्त झाले होते.


महापालिकेकडे पाणीपुरवठा योजनेची कोट्यावधी रुपयांची थकबाकी आहे. गेल्या काही महिन्यापासून चालू बीलही महापालिकेने भरलेले नाही. त्याचा परिणाम ता.१८ फेब्रुवारी रोजी महावितरणने पाणी पुरवठ्याच्या सर्वच योजनाची वीज तोडली आहे. मांजरा धरणात मृतसाठ्यात अत्यल्प पाणीसाठा असल्याने दहा दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. त्यात वीज तोडल्याने गेल्या सतरा दिवसांपासून शहरात निर्जळी आहे. महापालिकेने तातडीने पाणीपुरवठा सुरु करावा या मागणीसाठी भाजपच्या नगरसेवक व काही कार्यकर्त्यांनी सोमवारी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. नगरसेवक व शहराध्यक्ष गुरुनाथ मगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यात सभागृह नेता ॲड. शैलेश गोजमगुंडे, स्थायी समितीचे सभापती ॲड. दीपक मठपती, शैलेश स्वामी, अजितसिंह पाटील कव्हेकर, रागिणी यादव, मंगेश बिराजदार आदी सहभागी झाले होते.


नागरिक पैसे भरत नाहीत, आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून वीज बील भरले जात नाही, असे अधिकारी सांगत आहेत. पण गेल्या तीन महिन्यात किती कंत्राटदारांची बिले दिली, कोणत्या कॅबिनवर किती खर्च केला याचा आढावा घेतला तर चार वेळा वीज बील भरू शकलो असतो. जाणीवपूर्वक टंचाईची परिस्थिती निर्माण केली आहे. टँकर लॉबीला मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. महापालिकेतील काँग्रेस प्रशासनाचा धिक्कार असो. चोवीस तासात पाणीपुरवठा सुरु केला नाही तर जनआंदोलन करू हे जलआंदोलन असेल. यातून लातूर पेटले तर याची जबाबदारी प्रशासनावर असेल.
ॲड. शैलेश गोजमगुंडे, सभागृह नेता, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay : मुख्यमंत्री थलपती विजय यांचे सरकार डळमळीत?, फुटण्यासाठी एका आमदाराला ३५ कोटींची ऑफर, तिघांना अटक

LPG Price Today: कमर्शियल LPG सिलेंडर 183 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता घरगुती गॅसचे दर जाहीर! पाहा तुमच्या शहरातील नवे भाव

Belgium vs Senegal : ३ मिनिटांत बाजी पलटली, बेल्जियमने ०-२ अशा पिछाडीवरून मॅच फिरवली; लढवय्या सेनेगलचा दुर्दैवी पराभव

Latest Marathi News Live Update : एल्फिन्स्टन ब्रिज परिसर जलमय, सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

SCROLL FOR NEXT