bjp candidate Ramesh Karad withdraws nomination from Latur
bjp candidate Ramesh Karad withdraws nomination from Latur 
मराठवाडा

Vidhan Sabha 2019 : भाजपचे रमेश कराड यांची लातूर ग्रामीणमधून माघार

हरी तुगावकर

लातूर : लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा जागा वाटपात शिवसेनेला सुटल्याने नाराज झालेले भारतीय जनता पक्षाचे नेते रमेश कराड यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. बंडखोरी करून ते निवडणूक लढवणार याचीही चर्चा सुरु होती. पण अर्ज मागे शेवटच्या दिवशी त्यांनी आपला उमदेवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसचे धीरज देशमुख व शिवसेनेचे सचिन देशमुख यांच्यात लढत होणार आहे.

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला वाढवण्याचे काम गेली पंधरा वर्षापासून कराड यांनी केले आहे. या मतदारसंघात पक्ष काहीही नसताना त्यांच्यामुळे रेणापूर पंचायत समिती ताब्यात आली, जिल्हा परिषदेचे सहा सदस्य भाजपचे झाले. नगरपंचायत ताब्यात घेतली. अनेक ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा त्यांनी फडकवला.

गेल्या काही वर्षापासून कराड आपल्यालाच उमदेवारी मिळेल या आशेने कामालाही लागले होते. पण ऐनवेळी जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आला. यामुळे कराड समर्थकात मोठी नाराजी पसरली होती. येथे तसेच रेणापूर फाटा येथे कराड समर्थकांनी रास्तो रोको आंदोलन करून आपली नाराजी व्यक्त केली होती. तसेच कराड यांनी आपल्या समर्थकांचा मोठा संकल्प मेळावाही घेतला. या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. तसेच कराड यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी असा आग्रही धरला होता.

कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेवून कराड यांनी आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे जाहिर केले होते. उमेदवारी अर्जही दाखल केला होता. पण गेली दोन दिवस मात्र कराड शांतच दिसून आले. अखेर सोमवारी (ता. 7) अर्ज मागे शेवटच्या दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता काँग्रेसचे धीरज देशमुख व शिवसेनेचे सचिन देशमुख यांच्यात लढत होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT