Namita Mundada 
मराठवाडा

Exclusive : राष्ट्रवादीच्या उमेदवार नमिता मुंदडांना भाजपची उमेदवारी...!

सकाळ वृत्तसेवा

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसने केज मतदार संघातून उमेदवारी जाहीर केलेल्या नमिता अक्षय मुंदडा या आता भाजपच्या उमेदवार असणार आहेत. त्यांचा भाजप प्रवेश आणि उमेदवारीची घोषणा लवकरच होणार आहे. एकिकडे पक्षातील आमदार सोडून जात असताना आता पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे खुद्द पवारांनी जाहीर केलेला उमेदवारही पक्षातून जाणे हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दिवंगत लोकनेत्या डॉ. विमलताई मुंदडा यांनी सलग पाच वेळा केज मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. दिवंगत मुंदडा यांनी आपली राजकीय सुरुवात भाजपमधून केली. त्या दोन वेळा भाजप तर तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडुण आल्या. नऊ वर्षे त्यांनी विविध खात्यांचे मंत्रीपदही सांभाळले. दरम्यान, मागच्या निवडणुकीत त्यांच्या सुन नमिता मुंदडा यांचा भाजपच्या संगीता ठोंबरे यांच्याकडून पराभव झाला होता. परंतु, पराभवाच्या दुसऱ्या दिवशीपासून मुंदडा कुटूंबियांची या निवडणुकीसाठी तयारी सुरु होती. परंतु, मतदार संघातील पक्षांतर्गत गटबाजीमुळे मुंदडांची राजकीय गळचेपी होत असे. पक्षांतर्गत कुरघोड्यांच्या तक्रारी पक्षांच्या वरिष्ठांपर्यंतही गेल्या होत्या. मात्र, त्यावर कुठलाही ठोस पर्याय निघाला नाही.

दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच नमिता मुंदडा यांची राष्ट्रवादीतून उमेदवारी जाहीर केली. परंतु, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी आपल्या सोशल मिडीयाच्या बॅनर/पोस्टरवरुन पक्षाचे चिन्ह आणि पवारांचे फोटो काढून टाकत आपल्या अस्वस्थतेला वाट मोकळी करुन दिली. त्यांचा भाजप प्रवेश होऊन त्यांना भाजपची उमेदवारीही मिळेल, अशी अटकळ बांधली जात होती. परंतु, विद्यमान भाजप आमदार संगीता ठोंबरे यांनीही उमेदवारीसाठी मोठे प्रयत्न केले होते. अखेर सोमवारी सकाळी नमिता मुंदडा यांच्या भाजप प्रवेश आणि उमेदवारीला भाजपकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती ‘सकाळ’ला खात्रीलायक सुत्रांनी दिली. आज किंवा उद्या त्यांचा भाजप प्रवेश होऊन त्यांना उमेदवारी मिळणार आहे. जाहीर केलेला उमेदवार पक्षांतर करत असल्याने राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या निमित्ताने केज मतदार संघात नवीन राजकीय समिकरणे जन्माला येणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्यांदाच राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच उमेदवार जाहीर केले होते. यात केजमधून नमिता मुंदडा उमेदवार होत्या.

ठोंबरेंच्या भूमिकेकडे लक्ष
दरम्यान, भाजपच्या विद्यमान आमदार संगीता ठोंबरे यांची उमेदवारी कटल्यावरच शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांनी शेवटपर्यंत उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न केले. आता श्रीमती ठोंबरे काय भूमिका घेणार याकडेही लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RCB Live: ८ धावांत ६ फलंदाज बाद! भुवनेश्वर, हेझलवूडचा कहर! साहिलचा त्रिफळा उडाल्यावर विराटने काय केलं पाहा... Video

अमेरिकन लोक चीनमधून मागवत घर बांधण्याचं सामान! बाजारात ‘चायना होम्स’ची एंट्री; हा नवा ट्रेंड नेमका आहे तरी काय?

'मटका किंग'मध्ये एवढी मोठी चूक? नागराज मंजुळे विसरले पण प्रेक्षकांच्या नजरेतून नाही सुटली ती गोष्ट, म्हणतात- अरे...

Pune Domestic Violence Case: महिला पोलीस अंमलदाराचाच सासरकडून छळ; पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Nashik News : एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांकडून मृत्युपत्राची नोंद; ॲड. एकबोटे यांना ‘इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्ड्स’तर्फे प्रमाणपत्र

SCROLL FOR NEXT