bjp sakal
मराठवाडा

महिला अत्याचाराविरोधात भाजपचे शहरात आंदोलन

आंदोलक महिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात .

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. मुंबईसह राज्यभरात अत्याचाराच्या घटना घडत आसून हे रोखण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप करीत शनिवारी (ता.११) गजानन महाराज मंदिर चौकात गणरायाची आरती करुन ‘ठाकरे सरकारला सदबुद्धी दे’ हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान आंदोलक महिलांना गजानन महाराज मंदिर चौकात रस्त्यावर उतरल्यानंतर पोलिसांनी महिलांना ताब्यात घेतले.

आरतीनंतर रस्त्यावर उतरत महिलांनी ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनकर्त्या महिलांनी चौकात चारही बाजूने येणारे वाहने थांबविले होते. यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यानंतर जवाहरनगर पोलिसांनी महिला आंदोलकांना ताब्यात घेतले. या आंदोलनात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या सविता कुलकर्णी, महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा माधुरी अदवंत, शहराध्यक्षा अमृता पलोदकर, ओबीसी मोर्च्या प्रदेश कार्यकारिणीतील शालिनीताई बुंधे, मनिषा मुंडे, प्रतिभा जर्हाड, सुनंदा निकम, रुपाली मावळे, गीता आचार्य, वंदना शहा, संगीता शर्मा, दिव्या पाटील, वर्षा साळुंखे, गीता कापुरे, सुवर्णा तुपे, लता सरदार, शिवगंगा जायभाये आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MITCHELL STARC: मिचेल स्टार्क-शोरिफुल इस्लामचा अनोखा पराक्रम; १४९ वर्षांच्या कसोटी इतिहासात दुसऱ्यांदा घडलं असं काही!

Marathi News Live Updates : मी पुण्यात भाषण द्यायला नाही, तुमचं म्हणणं ऐकायला आलो आहे- राहुल गांधी

Money Luck Horoscope: प्रचंड पैसा, लाखोंचं पॅकेज अन् मनासारखी नोकरी! १ सप्टेंबरपासून द्वि-द्वादश योग ‘या’ राशींचं नशीब पालटणार

Manchar News : तरुणांना रोजगाराच्या संधी! पुणे जिल्ह्यात ‘आपले सरकार सेवा केंद्र’साठी अर्ज करण्याची सोमवार (ता. ३१) ऑगस्टपर्यंत मुदत

एल निनोचं रौद्ररूप येणार? शंभर वर्षांतील शक्तिशाली घटनांपैकी एक ठरण्याचा अंदाज, भारतासह जगाची चिंता वाढली

SCROLL FOR NEXT