हिंगोली : ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने शहरातील नांदेड नाका भागात शनिवारी (ता. २६) सकाळी अकरा वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली व काही वेळानंतर सोडून देण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, शहराध्यक्ष प्रशांत सोनी, जिल्हा सरचिटणीस फुलाजी शिंदे, पप्पु चव्हाण, तालुका अध्यक्ष संतोष टेकाळे, जिल्हा परिषद सदस्य अॅड. अमोल जाधव, हमीद प्यारेवाले, कैलास खर्जुले, गोविंद भवर, महिला जिल्हा अध्यक्षा यशोदा कोरडे, रजनी पाटील, क्रिष्णा रुहिटिया, उमेश नागरे, सखाराम मुटकुळे, नगरसेवक उमेश गुठे, कृष्णा ढोके, संदिप वाकडे, मनोज शर्मा, माणिक लोडे, करण भंसाळी, माजी नगरसेवक सदाशिव सुर्यतळ, गणेश शिंदे, बंडु क-हाळे, जेजेराम घ्यार, बद्रीनाथ जगताप, शाम खंडेलवाल, संजय ढोके, नारायण खेडकर, अंकुश जैस्वाल, आशिष वाजपेयी यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा - कोंढा (जि. नांदेड) येथील जोगदंड कुटुंबातील चौदा वर्षीय मुलीने अमेरिकेत विमान उडवून आकाशात झेप घेतली.
आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना कोरोनाचे नियम पाळण्या संदर्भात वारंवार सूचना दिल्या जात होत्या. तसेच प्रत्येकाला मास्क वाटण्यात आले . दरम्यान, अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाच्यावतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
ओबीसी समाजाला आरक्षण न दिल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे म्हणत भाजपा पदाधिकाऱ्यांनी सरकारवर ताशेरे ओढले. हे सरकार जाणीवपूर्वक ओबीसीसह सर्व समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. या सरकारला जाब विचारण्यासाठी हेचक्काजाम आंदोलन असल्याचे आंदोलकांनी सांगितले. ओबीसी समाजाला आरक्षण मिळेपर्यंत भाजपाच्या वतीने असाच लढा सुरु राहणार असल्याचेही यावेळी आंदोलकांनी सांगितलज. गरीब कष्टकरी जनतेला आरक्षण दिले तर यांच्या आयुष्यातील प्रश्न मार्गी लागेल. मात्रा स्वतः मध्ये मश्गुल असलेले सरकार हे ओबीसी आरक्षणाकडे अजिबात लक्ष देत नसल्याचा आरोप करण्यात आला. तसेच सेनगाव येथे आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन झाले तर औंढा येथे राम नागरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.