file photo 
मराठवाडा

बेघरांसाठी भाजपचे ‘कम्युनिटी किचन’ 

गणेश पांडे

परभणी : ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये परभणी शहरात अडकून पडलेल्या वेगवेगळ्या राज्यातील व स्थानिक बेघर मजुरांना भाजपच्या ‘कम्युनिटी किचना’चा लाभ देण्यात येत आहे. भाजपचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांच्या पुढाकारातून ४० बेघर कुटूंबांसाठी धान्य व इतर साहित्याचे वाटप करण्यास शनिवारी (ता.२८) जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.

परभणी शहरातील संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानात गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान राज्यातून आलेले तसेच महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातून कामासाठी आलेले बेघर असलेले ४० कुटुंब वास्तव्यास आहेत. भाजपच्यावतीने ‘कम्युनिटी किचन’ या अभियाना अंतर्गत परभणी भाजप महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्या वतीने या ४० कुटुंबांना पुढचे २० दिवस पुरेल अशी धान्याची रसद पुरविण्यात आली.


जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वाटप
या मध्ये गहू, तांदूळ, तेल, मसाला, स्वच्छतेसाठी साबण आदी साहीत्याचे वाटप परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर, तहसीलदार विद्याचरण कडवकर, परभणी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्या हस्ते शनिवारी (ता.२८) करण्यात आले. यावेळी भाजपा मनपा गटनेता मंगल मुदगलकर, संजय शेळके, माणिक शिंदे, विशाल बोबडे, कोंडीबा कुंभारे, शेषराव खंदारे, राजू रिक्षे, धनंजय जाधव, अशोक पारवे, महेंद्र वैरागर, निलेश भरोसे आदी या वेळी उपस्थित होते.


देशभरात ‘कम्युनिटी किचन’चे जाळे
‘कोरोना’ विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या २१ दिवसाच्या लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका बसणाऱ्या वर्गाचा जेवण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी.  नड्डा यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभरात भाजपच्या वतीने  ‘कम्युनिटी किचन’चे जाळे उभारण्यात येत आहे. परभणी शहरात पण जे बेघर आहेत व ज्यांना धान्याची टंचाई भासत आहे त्यांना परभणी भाजप महानगरच्या वतीने धान्य पुरविण्यात येणार आहे, अशा गरजूंनी त्यांच्या प्रभागातील भाजप मंडळ अध्यक्ष मंगल मुद्गलकर, मोकिंद खिल्लारे, भीमराव वायवळ, सुनिल देशमुख, सुहास डहाळे, विजय दराडे यांच्याशी संपर्क करावा, अशी माहिती परभणी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी दिली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Helicopter Crash: धक्कादायक! बद्रीनाथहून परतणारे हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ६ जणांचा मृत्यू

अर्शदीप सिंगचा वर्ल्ड रेकॉर्ड! IND vs NZ 4th T20I मध्ये फिलिप्सनेही नोंदवले एकापेक्षा एक सरस विक्रम

WhatsApp मध्ये मोठा बदल! आता प्रोफाइलला लावता येणार Cover Photo; मिळणार Facebook सारखा लूक

Marathi News Live Updates : बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट; ३ नोव्हेंबरला मिळणार बोनस

'ये सिर्फ कपड़ा नहीं, अभिमान है'; श्रद्धा कपूरच्या 'ईठा'चा ट्रेलर प्रदर्शित, विठाबाईंच्या भूमिकेतील लूक पाहून चाहते थक्क!

SCROLL FOR NEXT