file photo 
मराठवाडा

हिंगोलीत भिसे, चव्हाण यांच्या प्रवेशाने भाजपची ताकद वाढली- आमदार मेघना बोर्डीकर 

राजेश दारव्हेकर

हिंगोली : मराठा शिवसैनिक सेनेचे अध्यक्ष विनायक भिसे व पप्पू चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाने भाजपची ताकद वाढली असून, या दोघांनाही भविष्यात वाटचाल करण्यासाठी सुवर्ण संधी मिळाली असल्याचे प्रतिपादन जिंतूर येथील आमदार मेघनाताई बोर्डीकर यांनी शनिवारी (ता.१२) केले.

बळसोंड परिसरातील रामकृष्णा सभागृहात शनिवारी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून विनायक भिसे व पप्पू चव्हाण यांचा भाजप प्रवेश सोहळा आयोजित केला होता. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार गजाननराव घुगे, रामराव वडकुते, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, हरिश्चंद्र शिंदे, प्रा. दुर्गादास साखळे, के. के. शिंदे, शिवाजी पवार, प्रशांत सोनी, सुनील जामकर, यशोदा कोरडे आदींची उपस्थिती होती.

प्रारंभी विनायक भिसे मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणावरून शेकडो समर्थकासह दुचाकी रॅली बळसोंडपर्यंत काढली. दुचाकी रॅली सभागृहात पोहचताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. त्यानंतर या दोघांचाही मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश झाला.वयावेळी सभागृहात विनायक भिसे मित्र मंडळाचे शेकडो कार्यकर्ते यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT