Blight On Soyabean 
मराठवाडा

सोयाबीनवर करपा, तांबेरा रोगाचा प्रादूर्भाव; उत्पादनात घट होण्याची भीती

बाबासाहेब उमाटे

देवणी (जि.लातूर) - तालुक्यात सोयाबीन पिकावर करपा व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट होण्याची भीती निर्माण झाली आहे. नियमित कीडरोगासह या वर्षी एकाच हंगामात सलग तीन नवीन संकटे सोयाबीन पिकावर आल्याने शेतकरी धास्तावला आहे. सततचे दमट वातावरण, पिकाची झालेली अधिकची वाढ, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव, वातावरणातील बदल यामुळे यावर्षी ऐन बहरात असलेल्या सोयाबीन पिकावर करपा, तांबेरी, शेंग पापडी होणे या रोगांचां मोठा प्रादुर्भाव झाला आहे.

तालुक्यात सिंचनाच्या मर्यादित सुविधा उपलब्ध असल्याने खरीप हंगामच महत्त्वाचा असतो. शिवाय हंगामात ८० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीन पिकांची लागवड केली जाते. पेरणीच्या वेळी बियाणे उगवले नसल्याने दुबार व काही ठिकाणी तीन वेळा पेरणी करावी लागली. रिमझिम पावसाने पिकांची वाढ झाली आहे.

पिक फुल अवस्थेत असताना हिरव्या व पांढऱ्या रसशोषक कीडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला तर शेवटच्या टप्प्यात बुरशीजन्य रोगामुळे सोयाबीन पिकांच्या संकटात वाढच झाल्याचे चित्र आहे. करपा रोगामुळे पिक वेळे अगोदर काढणीस येऊन उत्पादन घटते. शिवाय सोयाबीनच्या शेंगा पापडी होत असल्याने त्या न भरल्याने उत्पादनावर परिणाम होत असतो. नियमित रोगासह अन्य आव्हाने निर्माण झाल्यामुळे सोयाबीन पिकावरील संकटावरील संकटाची मालिक संपता संपत नसल्याचे चित्र आहे.


सततच्या पावसाळी वातावरणामुळे सोयाबीन पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यासाठी हेक्झाकोनाझोल, टेबीकोनाझोल, मॅन्कोझेब, कार्बेडीझम यासह अन्य बुरशीनाशकांची शिफारशीनुसार व वेळेत फवारणी घेणे आवश्यक आहे. हिरवळीच्या खताचा वापर, विरळ लागवड, वेळेत फवारणी घेणे, माती परीक्षण करुन त्यानुसारच खताची पेरणी केल्यास निश्चितच उत्पादन वाढीसाठी सहकार्य होऊ शकते.
- शिरीष घनबहादुर, तालुका कृषी अधिकारी



लक्षणे
-पाने वेळे अगोदर पिवळी होणे, पानावर डाग पडणे,
- सोयाबीनच्या पानाच्या कडा जळल्यासारख्या होणे
-शेंगावर काळे डाग व न भरताच वाळणे
- पिक लवकर काढणीस येणे

उपाय
-नियमित पिक फेरपालट अपेक्षित
-बुरशीनाशकाची वेळेत फवारणी घ्यावी
-एकरी सोयाबीन झांडाची संख्या मर्यादित ठेवणे व दोन ओळीतील अंतर वाढवणे
- मातीपरीक्षणानुसारच खताची मात्रा वापरावी

(संपादन - गणेश पिटेकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT