रक्तपेढी.jpg 
मराठवाडा

रक्तपेढ्यांनी ‘परिषदे’च्या सूचनांचे पालन करावे

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रक्तपेढीने काळजी घेण्याबाबत राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद यांनी काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. या सुचनांचे पालन नांदेड जिल्ह्यातील रक्तपेढ्यांनी करावे असे आवाहन अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त एम. जे. निमसे यांनी केले आहे.

शिबीरावेळी अंतर राखावे
रक्तदान शिबीरावेळी (सोशल डिस्टंसिंगचे) सामाजिक अंतराचे तंतोतंत पालन करावे. परदेश प्रवासाचा इतिहास, कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीशी संपर्क, कोरोना झालेल्या व्यक्ती यांच्याकडून केलेले रक्तदान शिबीरात तसेच रक्तपेढीत रक्त संकलित करू नये. रक्तसंकलानावेळी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांचे वापरापूर्वी व वापरानंतर निर्जंतुकीकरण करावे.

हेही वाचा.....

शिबीरात सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात
रक्तपेढीचे कर्मचारी, अधिकारी यांनी नियमितपणे साबणाने किंवा सॅनिटायझरने हात स्वच्छ करावे. रक्तपेढीचे काम करतेवेळेस हात मोजे व मास्क यांचा वापर करावा. रक्तपेढीत येणाऱ्या व्यक्तींना मास्क वापरण्यांची सक्ती करावी. त्यांच्या वापरासाठी रक्तपेढीच्या प्रवेशद्वारात हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर उपलब्ध करून ठेवावे. रक्तदान शिबीराच्यावेळी याप्रमाणे सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात.

हेही वाचलेच पाहिजे.....

विशेष काळजी घेऊन रक्त संकलन करावे
कोणत्याही परिस्थितीत शिबीराच्या वेळी गर्दी होणार नाही, याची पूर्ण दक्षता घ्यावी. कॅम्प, जागा व परिसर स्वच्छ असावा. रक्तपेढीद्वारे कोविड- १९ बाबत कॅम्पच्या ठिकाणी जनजागृती करावी. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने रक्ताचा तुटवडा होऊ नये, यासाठी रक्तपेढ्यांनी विशेष काळजी घेऊन अधिकाधिक रक्त संकलन करावे, असेही आवाहन जिल्ह्यातील सर्व रक्तपेढ्यांना करण्यात आले आहे.

कोरोना बाबत जिल्ह्यात दिलासादायक परिस्थिती
जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाच्या संसर्गाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही. ही नांदेड जिल्ह्यातील दिलासादायक परिस्थिती आहे. आतापर्यंत एकूण क्वारंटाइन असणाऱ्या नागरिकांची संख्या ५५६ आहे. यामधील क्वारंटाइन कालावधी पूर्ण झालेले १६९ असून सध्या निरीक्षणाखाली असलेले ६० नागरिक आहेत. यापैकी दवाखान्यात क्वारंटाइनमध्ये ३९ नागरिक आहेत. तसेच घरीच क्वारंटाइनमध्ये असलेले ५१७ अशी संख्या आहे. आज तपासणीसाठी २२ नागरिकांचे नमुने घेतले होते. आजपर्यंत एकुण २९६ नमुने तपासणी झाली आहेत. यापैकी २२६ नमुने निगेटीव्ह आले असून६५ नमुने तपासणी अहवाल येणे बाकी आहे. तसेच पाच नमुने नाकारण्यात आले आहेत.

७४ हजार प्रवाशी नागरिक
जिल्ह्यात बाहेरुन आलेले एकूण प्रवासी ७४ हजार ३२६ असून त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत. यामध्ये कंधार तालुक्यात- ९,४८१, किनवट- २,५२६6, देगलूर- ७,१९५, धर्माबाद- १,५०५, बिलोली- ४,४१३, लोहा- ४,९६३, उमरी- १,९३८, हदगाव- ५,९८२, भोकर-२,२२०, मुखेड- ११,६३७, मुदखेड- १,७८०, अर्धापूर- २,३५६, माहूर-३,४३७, हिमायतनगर- १,९७९ नायगाव- ६,३८३, नांदेड तालुका- २,४४२ तर नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड- ४,०८९ यानुसार जिल्ह्यात एकूण प्रवासी संख्या ७४ हजार ३२६ एवढी आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

Latest Maharashtra News Updates : सामान्यांची एकीची वीण उसवू नये- शरद पवार

उपमुख्यमंत्री शिंदेंनी कोणत्या अधिकाराखाली स्थगिती दिली? हायकोर्टाची विचारणा, बेकायदा इमारत प्रकरणी अडचणी वाढणार

Mahadevi Elephant : कोल्हापूरकरांच्या लढ्याला येणार यश? नांदणी मठाच्या 'महादेवी'साठी उच्चस्तरीय समिती घेणार निर्णय

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार; ब्रह्मपुरी तालुक्यातील लाखापूर येथील घटना

SCROLL FOR NEXT