अनिकेत घुगे सकाळ
मराठवाडा

अपहरण करुन मुलाचा निर्घृण खून, आठ दिवसानंतर आरोपी जेरबंद

सुभाष बिडे

घनसावंगी (जि.जालना) : देवी दहेगाव (ता.घनसावंगी) (Ghansawangi) येथे एका पंधरा वर्षे मुलाचे अपहरण करुन दोन जणांनी खून केल्यांची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. दोन्ही आरोपींना घनसावंगी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. देवी दहेगाव येथील अनिकेत भाऊसाहेब घुगे (वय १५) हा एक ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजेपासून अचानक गायब झाला होता. या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात (Jalna) अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक नितीन पतंगे यांच्यासह पोलीस पथके अनिकेत आणि त्यांचा शोध घेत होते. मात्र काहीच धागेदोरे हाती लागत नव्हते. पोलिसांनी गावातील काही संशयितांची (Crime Against Child) कसून चौकशी सुरू केली होती. त्या दरम्यान घटनेच्या रात्री उशिरा यातील संशयित आरोपी गावाबाहेरुन येताना काही ग्रामस्थांनी पाहिले. याच धाग्याच्या आधारे पोलिसांनी त्या संशयितांची कसून चौकशी केली असता त्याने एका साथीदारासह खून केल्याची कबुली दिली. देवी दहेगाव शिवारातील गोरखनाथ काळे यांच्या उसाच्या शेतात नेऊन आणि अनिकेत यांच्या डोक्यात दगड मारून खून करण्यात आल्याची कबुली महादेव नामदेव शिंदे आणि आकाश भागवत शिंदे यांनी दिली.

हे दोन्ही आरोपी १९ वर्षीय असून त्यांना जेरबंद करण्यात आले. घटनेची माहिती कळताच पोलिस अधीक्षक विनायक देशमुख व अंबड उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, सहायक पोलिस निरीक्षक नितीन पतंगे यांनी रविवारी (ता.आठ) घटनास्थळी भेट देऊन आठ दिवसांपूर्वीच घटना घडली असल्याने मृतदेह पूर्णपणे कुजला होता. त्यामुळेच घटनास्थळी वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून तेथेच शवविच्छेदन करण्यात आले. मृत अनिकेत याच्यावर शोकाकूल वातावरणात देवी दहेगाव येथे बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी आरोपी महादेव नामदेव शिंदे , आकाश भागवत शिंदे यांच्या विरोधात घनसावंगी पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यासह अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT