Beating esakal
मराठवाडा

Devgaon Rangari Crime : अंगणात कचरा टाकण्याच्या क्षुल्लक कारणावरून तुंबळ हाणामारी; दोन जण गंभीर जखमी, आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

अंगणात कचरा टाकण्याच्या क्षुल्लक कारणावरुन झालेल्या तुंबळ मारहाणीत तंटामुक्ती अध्यक्षासह दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता. ५) सकाळी ताडपिंपळगांव, ता. कन्नड येथे घडली.

संतोष गंगवाल

देवगांव रंगारी - अंगणात कचरा टाकण्याच्या क्षुल्लक कारणावरुन झालेल्या तुंबळ मारहाणीत तंटामुक्ती अध्यक्षासह दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता. ५) सकाळी ताडपिंपळगांव, ता. कन्नड येथे घडली. याबाबात देवगांव रंगारी पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक नारायण गायकवाड (वय-३४) राहणार ताडपिंपळगाव यांनी समक्ष पोलीस ठाणे देवगाव रंगारी येथे हजर होऊन तक्रारी जबाब दिला की, शनिवारी (ता. पाच) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास आमचे शेजारी राहणारे रमेश रामभाऊ गायकवाड व त्याची बायको रंजना रमेश गायकवाड हे आमचे जागेवर नेहमी काडीकचरा व घाण टाकतात.

म्हणून मी रमेश यास बोललो की, आमचे जागेवर घाण करु नका व ती घाण साफ करुन घ्या, असे समजावुन सांगत असतांनाच रमेश रामभाऊ गायकवाड व त्याची पत्नी रंजना रमेश गायकवाड यांनी माझे काहीएक न ऐकता मला शिवीगाळ केली. त्यानंतर रमेश याचा मुलगा उमेश रमेश गायकवाड हा माझ्या अंगावर धावुन आला व त्याचे हातातील काहीतरी हत्याराने माझे कपाळाच्यावर डोक्यात मारले.

त्यामुळे माझ्या डोक्यास जखम होउन रक्त निघाले. आमचा आरडाओरडा ऐकुन माझे चुलते पांडुरंग देवराव गायकवाड हे आले व ते मला त्याचे पासून सोडवित असतांना गणेश रमेश गायकवाड याने त्याचे हातातील विळ्याचे मुठ धरुन माझे चुलते पांडुरंग देवराव गायकवाड यांच्या डोक्यात मारले. त्यामुळे त्याचे ही डोके फोडुन जखमी केले.

त्यानंतर माझे लहान भाऊ सोमीनाथ नारायण गायकवाड व वडील नारायण देवराव गायकवाड, माझी चुलती सुमनबाई पांडुरंग गायकवाड, चुलती चंद्रकलाबाई छगन गायकवाड, आई शोभाबाई नारायण गायकवाड यांना सर्वांना गोरख रामभाऊ गायकवाड त्याची पत्नी सुनिता गोरख गायकवाड, अदित्य गोरख गायकवाड, दिपक रमेश गायकवाड यांनी सर्वांनी मिळून वरिल सर्वाना शिवीगाळ करुन चापटबुक्याने मारहाण करुन जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहे. आमचे भांडण व आम्हाला मारहाण करत असतांना आमचे गावातील तंटामुक्ती अध्यक्ष मोहसिन कैसर शेख हे भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही मारहाण झाली.

याबाबत अशोक नारायण गायकवाड यांच्या फिर्यादीवरून रमेश रामभाऊ गायकवाड, रंजना रमेश गायकवाड, उमेश रमेश गायकवाड, गणेश रमेश गायकवाड, गोरख रामभाऊ गायकवाड, सुनिता गोरख गायकवाड, अदित्य गोरख गायकवाड, दिपक रमेश गायकवाड सर्व रा. ताडपिंपळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप राजपुत, पोलीस उपनिरीक्षक रमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार संजय काळे करत आहेत.

दरम्यान, रंजना रमेश गायकवाड यांनीही दिलेल्या फिर्यादीवरून अशोक गायकवाड,सोमीनाथ गायकवाड, छगन गायकवाड व पांडुरंग गायकवाड यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

SCROLL FOR NEXT