दुय्यम निबंधकावर लाच प्रकरणी गुन्हा sakal
मराठवाडा

परभणी : दुय्यम निबंधकावर लाच प्रकरणी गुन्हा

महिला अधिकाऱ्यांविरुद्ध लाच मागितल्या प्रकरणी सोनपेठ पोलिसात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

सोनपेठ : सोनपेठ येथील दुय्यम निबंधक कार्यालयात प्रभारी असणाऱ्या महिला अधिकाऱ्यांविरुद्ध लाच मागितल्या प्रकरणी सोनपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील एका तक्रारदाराने परभणी येथील लाचलुचपत विभागाकडे ता.०३ फेब्रुवारी रोजी सोनपेठ येथील प्रभारी दुय्यम निबंधक श्रद्धा कणकुटे यांच्याकडून शेतीच्या रजिस्ट्री संदर्भात दहा हजार रुपयांची लाच मागीतली जात असल्याची तक्रार दाखल केली होती. याबाबत सोनपेठ येथील दुय्यम निबंधक यांनी मागितलेली लाच ता. ०३ मार्च रोजी स्वीकारली नाही. परंतु लाच मागणी केल्याच्या पुराव्या वरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ता.०१ एप्रिल रोजी सोनपेठ प्रभारी दुय्यम निबंधक श्रद्धा कणकुटे यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक डॉ. राहुल खडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक किरण बिडवे, पोलीस निरीक्षक श्रीमती स्वप्नाली धुतराज तसेच कर्मचाऱ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: ''तो' व्यवहार रद्द! माझ्या जवळचा कुणीही असला तरी..'' अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिली तंबी

Motivational Story: वडील रिक्षा चालक तर आई गृहिणी, घरची परिस्थिती बेताची... कष्टातून लेक उभी राहिली अन् सीए परिक्षेत मोठी बाजी मारली

Latest Marathi News Live Update: वर्सोवा गावातील दुकानाला मोठी आग

कुणीही नसताना फ्लश झालं, खांद्यावर हात ठेवला... दिग्दर्शकाने सांगितला मुकेश मिलमध्ये 'उलाढाल'च्या शूटिंगचा अनुभव

voters duplicate names: चिपळूणमधील मतदार यादीतून ४०० दुबार नावे हटवली; निवडणूक तयारीसाठी अंतिम यादी अद्ययावत

SCROLL FOR NEXT