Beed News  sakal
मराठवाडा

Beed News : वीटभट्टी क्लस्टरमुळे लाखोंचा होणार फायदा ; परळीत राखेच्या तुटवड्याचा प्रश्न कायम

हर व परिसरात मोठ्या प्रमाणावर वीटभट्ट्या असून दोन वर्षांपासून येथील औष्णिक विद्युत केंद्रातील राखेच्या कमतरतेमुळे काही वीटभट्ट्या बंद पडल्या आहेत. तर आणखीनही मोठ्या संख्येने वीटभट्ट्या सुरू असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

परळी वैजनाथ : शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर वीटभट्ट्या असून दोन वर्षांपासून येथील औष्णिक विद्युत केंद्रातील राखेच्या कमतरतेमुळे काही वीटभट्ट्या बंद पडल्या आहेत. तर आणखीनही मोठ्या संख्येने वीटभट्ट्या सुरू असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार वीटभट्टी व रेशीम क्लस्टरला तत्त्वतः मान्यता दिली आहे. यामुळे शहर व परिसरातील वीटभट्ट्या, येथील कार्यरत हजारो मजूर आणि त्यांच्यावर विसंबून असलेल्या बाजारपेठेला याचा फायदा होईल, अशी अपेक्षा आहे.

येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रामध्ये हजारो टन राख तयार होते. सुरवातीला या राखेचे काय करायचे, हा प्रश्न निर्माण झाला होता. ही राख अगोदर तळ्यात पाण्याद्वारे सोडली जात असे. तळ्यातील पाणी संपल्यानंतर हवेतील प्रदूषणात वाढ होवू लागली. हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी विद्युत निर्मिती केंद्राच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. राखेचा वापर सिमेंट निर्मितीसाठी होवू लागला.

या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातून राख टँकरद्वारे वाहून नेली जात असे. तर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राकडून वीटभट्टीसाठी मातीसोबत काही प्रमाणात राखेचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. व राख वीटभट्टीसाठी मोफत देण्यात आली. यामुळे राखेचा वापर वीटभट्ट्यांसाठी होवू लागला.

हळूहळू वीटभट्ट्यांची संख्या विद्युत निर्मिती केंद्राच्या परिसरात वाढू लागली. यातून मोठा फायदा होतोय लक्षात आल्यानंतर तालुक्यात वीटभट्ट्यांची संख्या ६०० ते ८०० झाली आहे. एका वीटभट्टीसाठी जवळपास तीसपेक्षा अधिक मजूर लागतात. हे मजूर आपल्या परिवारासह वीटभट्ट्यांवर राहतात. परिवारातील सर्वांनाच रोजगार मिळतो. यामुळे येथील बाजारपेठेला चांगली चालना मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT