मराठवाडा

Harshvardhan Jadhav: शेतकऱ्यांना चांगला भाव दिल्यावर पोटात दुखतय, हर्षवर्धन जाधवांनी केली 'ती' मागणी

तेलंगणाला कांदा विकतोय म्हणून राग का येतोय?

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर: राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे बेजार आहे. कांदा सडतोय म्हणून त्याला तो रस्त्यावर फेकून द्यावा लागला. राज्य सरकारकडे आम्ही कांदा खरेदी करण्याची मागणी केली तर त्यांनी सपशेल नकार दिला.

आता आम्ही इथला कांदा तेलंगणात नेवून विकला, शेतकऱ्यांना चांगला भाव दिला, तर अनेकांच्या पोटात दुखत आहे.

सरकारची इज्जत गेली असे बोलले जाते. मग अकराशे रुपयांनी तुम्ही कांदा खरेदी करा, साडेतीनशे रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात टाका, नाही पाठवणार कांदा तेलंगणाला, अशा शब्दात बीआरएसचे समन्वयक माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राज्य सरकारला आवाहन केले आहे.

श्री. जाधव यांनी एक व्हिडिओ जारी करत आपल्यावर तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांचा कांदा नेवून विकला म्हणून टीका केली जात असल्याचा आरोप केला आहे.

अनेकांच्या पोटात दुखायला लागलंय. पण आम्ही जेव्हा शेतकरी रस्त्यावर कांदा फेकून देत होतो, त्यावेळी महाराष्ट्र सरकारने तो खरेदी करावा, कांदा उत्पादकाला साडेतीनशे रुपये अनुदान द्यावे यासाठी आंदोलन केले, तर सरकारने स्पष्टपणे नकार दिला.

मग आम्ही शेतकऱ्यांना मदतीचा हात देत तेलंगणा सरकारशी बोलणी करून तिथल्या मार्केट कमिटीत ग्रेडनुसार कांद्याची विक्री अकराशे ते अठराशे रुपये भावात केली, तर सरकारला राग येण्याचे काय कारण? असा सवाल जाधव यांनी विचारला आहे.

तर आमच्यावर टीका करण्या आधी तुम्ही शेतकऱ्यांच्या कांद्याला अकराशे रुपये भाव द्या, जाहीर केलेले साडेतीनशे रुपये अनुदान त्यांच्या खात्यात जमा करा, मग आम्ही तेलंगणाला कांदा नेण्याचे बंद करतो असे जाधव यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT