file photo 
मराठवाडा

घरीच साजरी झाली बुद्ध पौर्णिमा; फिजिकल डिस्टन्सिंग पाळत अभिवादन 

कैलास चव्हाण

परभणी : जगाला शांतीचा मार्ग दाखविणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती अर्थात बुद्ध पौर्णिमा गुरुवारी (ता. सात) शहरासह जिल्ह्यात घरीच साजरी करण्यात आली. बुद्ध विहारामध्ये फिजिकल डिस्टन्सिंग पाळत अभिवादन करण्यात आले.
आर्यसत्य व अष्टांगिक मार्ग यांच्या माध्यमातून संपूर्ण जगाला शांतीचा मार्ग दाखविणारे भगवान गौतम बुद्ध यांची वैशाख पौर्णिमेला जयंती दरवर्षी संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरी होते. परभणी शहर आणि जिल्ह्यात या निमित्ताने विविध कार्यक्रम असतात. सामुदायिक बुद्ध वंदना, विहारमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. परंतु, यंदा लॉकडाउनमुळे हे कार्यक्रम घरीच पार पडले. अनुयायांनी घरीच कुटुंबासह पौर्णिमा साजरी केली. सकाळी घरीच भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीसमोर ग्रंथाचे वाचन करण्यात आले. तसेच बुद्ध वंदना घेण्यात आली.

भीमनगरात गरजूंना मदत
परभणी शहरातील बुद्ध विहारमध्ये मोजक्याच अनुयायांच्या उपस्थितीत पंचशील ध्वजवंदन करण्यात आले. शहरातील भीमनगर येथील तथागत उद्यानात आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते पंचशील ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी बुद्ध वंदना घेण्यात आली. तसेच नगरसेवक सुशील कांबळे यांच्यावतीने एक हजार मास्कचे परिसरात वाटप करण्यात आले. तसेच ७८ गरजूंना अन्नधान्याच्या किट देण्यात आल्या.

हेही वाचा : ‘सकाळ’च्या बातमीची दखल : विद्यार्थ्यांचा मार्ग मोकळा

कावलगाव येथे कार्यक्रम
कावलगाव (ता. पूर्णा) येथे तथागत भगवान बुद्ध यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राथामिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. अशोक बनसोड होते, तर प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद सदस्य कोंडिबा सोनटक्के, प्रा. जी. सी. बिऱ्हाडे, सामाजिक कार्यकर्ते नारायण पिसाळ, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेरमन बाबूराव देशमुख, ज्ञानोबा वंजे, पोलिस पाटील अविनाश वंजे, रामराव पिसाळ, मनोहर दुधमल, देवानंद दुधमल, चंद्रकांत भोसले, दिगंबर दुधमाल, माधवराव डाके, सुशेन बिऱ्हाडे उपस्थित होते.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra News: अवघ्या दोनशे रुपयांत होणार जमिनींचे पोटहिस्से, मोजणी फीमध्ये सवलत; राज्य भूमी अभिलेख विभागाचा निर्णय

वरिष्ठांच्या छळाला कंटाळून अधिकाऱ्याचं टोकाचं पाऊल, निवृत्तीला उरलेले फक्त दहा दिवस; काय घडलं?

Jalgaon News : प्रेमविवाहाचा राग, तरुणाला नग्नावस्थेत खांबाला बांधून मारहाण; ५ जणांना अटक

Maharashtra News: वीज चोरी; गुन्हा आणि जीवाला धोका; भारतीय विद्युत कायदा २००३ अंतर्गत कठोर शिक्षा

Latest Marathi News Live Update : वर्धा-नांदेड महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हलर जळून खाक

SCROLL FOR NEXT